रिसोड नगर परिषद संकुलातील व्यापारी त्रस्त,पावसाच्या पाण्यामुळे झाले गटाराचे स्वरूप.अनेक निवेदन देऊनही नगर परिषदेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.

 

नारायणराव आरू पाटील/प्रतिनिधी

 

रिसोड नगर परिषद संकुलातील व्यापारी त्रस्त झाले आहेत. पावसाच्या पाण्यामुळे या ठिकाणी गटाराचे स्वरूप आले असून नगरपरिषदेला वारंवार निवेदने देऊन सुद्धा रिसोड नगरपरिषदेकडून याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मागील १५ वर्षापासून पाण्याचे गटार साचण्याची अडचण सर्व व्यापाऱ्यांना होत आहे याआधी कधी जास्त असा विषय केला नाही पण ही अडचण खूप जास्त प्रमाणात वाढत असल्या कारणाने याला काहीतरी तोडगा काढण्यात यावा याकरिता नगरपरिषद मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

 

 

 

हे पाणी बाहेर काढण्याचा जुनी नगरपरिषद कॉम्प्लेक्स मधील व्यापारी मंडळी नियोजन करतात पण त्यांना समोरील अतिक्रमातील लोक हे नगरपरिषद कॉम्प्लेक्स मधील व्यापारी मंडळी सोबत नेहमीच भांडण व शिवीगाळ करतात व कॉम्प्लेक्स वरील व्यापारी हे काही मदत करत नाहीत उलट जास्तीचा कचरा खाली गड्ड्यात टाकतात वरील पाणी हे डायरेक्ट खाली सोडतात त्यांच्या पाण्याचा प्रवाह हा बाहेर नसून हा खाली तळघरात मध्येच सोडलेला दिसतो.

 

 

 

मुख्य बाजारपेठ मधील नगरपरिषद कॉम्प्लेक्स समोरील अतिक्रमणातील दुकाने खूप प्रमाणात वाढले व यांच्या वाढीमुळे खालील खड्ड्यातील कॉम्प्लेक्स व दुकान हे काहीच दिसत नाही याचा नगरपरिषद कॉम्प्लेक्स मधील व्यापारी मंडळींच्या व्यापारावर खूप परिणाम होत आहे.सर्वांचेच आर्थिक नुकसान होत आहे.त्यात पावसाच्या पाण्याची भर पडली आणि तळघरातील कोबा हा खूप जीर्ण झाला आणि झऱ्याच्या पाण्यात वाढ झालेली दिसते.

 

 

 

या आधीही या विषयावर नगरपरिषदांना विनंती केलेली आहे निवेदन देऊन यावर अजूनही तोडगा निघालेला नाही या कारणाने सर्व व्यापारी बंधू मच्छी पालनाचा व्यवसाय सुरू करू असे म्हटले याबाबत सर्व व्यापारी मंडळींनी निवेदनात मच्छी पालन करण्याची परवानगी मागितली .यावेळी अजय कानडे,शंकर राऊत, महावीर उखळकर, आवेज शेख, युसुफ शेख, प्रदीप वाकोडे, अनिल कानडे, आदी व्यापारी उपस्थित होते.