
नारायणराव आरू पाटील/प्रतिनिधी
शेतकरी नेते रविकांत तुपकर हे सिंदखेडराजा येथे अन्नत्याग आंदोलन करत आहे.सोयाबीनच्या दरासंदर्भात व इतर मागण्याच्या संदर्भात या आंदोलनाला बळ यावे व सरकारला मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडण्यासाठी तात्काळ निर्णय घ्यावा. शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सोयाबीन, पिक विमा अतिवृष्टी, वनप्राण्यापासून झालेली नुकसान भरपाई शेतीला तार कुंपण व इतर सर्व मागण्या संदर्भात सकारात्मक चर्चा करून हा प्रश्न सोडवावा.
या मागण्यांचा समर्थनार्थ शेतकरी बालाजी मोरे,सतीष इढोळे हे वाशिम जिल्ह्यातील अडोळी येथील मोबाईलच्या टाॅवर वर चढून अनोखे आंदोलन करण्यात आले या सरकारला दाखवून देऊ आणि सरकारला गुडघे टेकायला भाग पाडू आता आम्ही जोपर्यंत रविकांत तुपकर यांच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत हे मोबाईल टाॅवर वरून खाली उतरणार नाही असे बालाजी मोरे व सतीष इढोळे यांनी बोलतांना सांगितले.याबाबत शासन व प्रशासन दखल घेते का? हे औत्सुक्याचे ठरेल.