सिंदखेडराजा प्रतिनिधी
मातृतीर्थ सिंदखेड राजा तहसील समोर शेतकऱ्यांचे नेते रविकांत तुपकर (ravikant tupkar) यांचा आंदोलनाचा आज चौथा दिवस आहे. गेल्या तीन दिवसापासून त्यांच्या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे व याचे पडसाद राज्यभरात उमटले आहेत. शेतकऱ्याचे संपूर्ण कर्जमुक्ती, सोयाबीन व कापसाची दरवाढ, पिक विमा, अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीला सरसकट शंभर टक्के नुकसान भरपाई, वन्य प्राण्यापासून शेतीचे नुकसान होणार नाही म्हणून शेतीला कंपाऊंड अशा शेतकऱ्यांच्या विविध मागण्यासाठी रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे.
४ सप्टेंबर पासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे.आज या आंदोलनाचा चौथा दिवस आहे. परंतु आज अचानक त्यांची तब्येत घालवल्याने शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतलेली आहे. हातामध्ये विष घेऊन व विविध प्रकारचे हातामध्ये फलक घेऊन सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली. प्रशासनाला पोलिसामार्फत आंदोलन मोडीस काढायचे असेल तसे त्यांनी कळवावे. आम्ही आता गोळ्या अंगावर घेऊन सुद्धा मरायला तयार आहोत. आमचा बळी जर सरकारला घ्यायचा असेल तर खुशाल घ्या.. परंतु शेतकऱ्याचा संयम जर सुटला तर याला जबाबदार तुम्ही राहणार असा इशारा रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे.
परंतु आज आंदोलनाच्या चौथ्या दिवशी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची तब्येत अत्यंत खालावली आहे. डॉक्टरांनी त्यांची तपासणी केली असता रक्तातील साखरेचे प्रमाण अत्यंत कमी झाले असून त्यांना प्रचंड अशक्तपणा सुद्धा जाणवायला लागला आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सरकारतर्फे आंदोलन मागे घेण्यासाठी मागण्या सुरू आहेत परंतु मागण्या पूर्ण न झाल्यास अन्नाचा एकही कण घेणार नाही, शहीद झालो तरी चालेल असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारला दिला आहे.