नारायणराव आरू पाटील/प्रतिनिधी
क्रीडा युवक व सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय वाशिम, येथे हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांचे जन्मदिनानिमित्त २९ ऑगस्ट हा राष्ट्रीय क्रीडा दिन (rastriy krida din) म्हणून संपूर्ण भारत देशात साजरा करण्यात येतो. महाराष्ट्र राज्यामध्ये क्रीडा व खेळाचा प्रचार व प्रसार शहरी भागात आढळतो जोपर्यंत ग्रामीण भागातील नागरिकापर्यंत खेळाचे महत्व पोचवले जात नाही तोपर्यंत तेथील युवक युवतीमध्ये क्रीडाविषयक जाणे व वातावरण निर्माण होणार नाही.
तोपर्यंत खऱ्या अर्थाने क्रीडा व खेळाची प्रगती साध्य करणे शक्य होणार नाही ही वस्तुस्थिती लक्षात घेता शासनाने २९ ऑगस्ट हा दिवस क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात येतो.सदर क्रीडा दिन साजरा करताना दिनांक 26 ते 31 ऑगस्ट या कालावधीत विविध शैक्षणिक संस्थेमार्फत स्थानिक पातळीवर विविध खेळांचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामार्फत आले आहे .
१९ वर्षाचे आतील मुले व मुली चालण्याची शर्यत लक्ष्मीचंद विद्यालय शेलुबाजार येथे, दिनांक २६/८/२०२४, बॅडमिंटन जिल्हा संकुल वाशिम येथे २७/८/२०२४ खो – खो जिल्हा क्रीडा संकुल, वाशिम येथे२८/८/२०२४ टेबल टेनिस जिल्हा क्रीडा संकुल, वाशिम येथे२८/८/२०२४ रस्सीखेच जिल्हा क्रीडा संकुल समिती वाशिम येथे दिनांक२९/८/२०२४ बास्केटबॉल जिल्हा क्रीडा संकुल समिती,२९/८/२०२४ लगोरी यशवंतराव चव्हाण विद्यालय मंगरूळपीर, दिनांक ३०/८/२०२४ इत्यादी खेळाचे आयोजन करण्यात येणार आहे.
स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी/संघानी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशिम येथे दिनांक २६/८/२०२४ रोजी सकाळी ११वा. नाव नोंदणी आपल्या मूळ कागदपत्रासह करावी. २९ ऑगस्ट रोजी सन २०२३-२४या वर्षात शालेय स्तरावर विजयी झालेला संघ, वैयक्तिक स्पर्धेत भाग घेतलेले खेळाडू, राष्ट्रीय शालेय स्तरावर, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, अजिंक्य स्पर्धेत संघटनेमार्फत मान्यता प्राप्त ५% आरक्षण खेळाडूतील खेळाडूचा सत्कार दिनांक २९/८/२०२४ रोजी दुपारी ३.००वा. जिल्हा क्रीडा संकुल समिती वाशिम येथे करण्यात येणार आहे.
सन २०२३-२४ या वर्षात ज्या संस्थेने, खेळाडूने राज्यस्तरीय स्पर्धेत पदक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भाग घेतला, अशा सर्व खेळाडूंनी मूळ कागदपत्राच्या छायांकित प्रत दिनांक २६ आॅगष्ट २०२४ पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात श्री किशोर बोंडे राज्य क्रीडा मार्गदर्शक, विकास तिडके, भारत वैद्य यांच्याशी संपर्क साधावा. असे आवाहन श्रीमती लता गुप्ता(ठोसरे), जिल्हा क्रीडा अधिकारी वाशिम यांनी आवाहन केले आहे.