
नारायणराव आरु पाटील, वाशिम/प्रतिनिधी
रिसोड तालुक्यातील घोटा शेतशिवारामध्ये वन्य प्राण्यांचा हैदोष रोही , रानडुक्कर, माकड, हरीण या वन्य प्राण्यांनी शेतकऱ्यांच्या शेतातील पिके जमीन दोस्त केली. सोयाबीन, हळद व इतर पिके शेतकरी ज्ञानबा राजाराम मोरे, चंद्रभागा ज्ञानबा मोरे, प्रकाश शंकर मोरे, गणेश दत्तराव गवळी, परमेश्वर कावरखे व इतर शेतकरी यांच्या शेतामध्ये वन्य प्राण्यांचा हैदोष चालू आहे.या वन्य प्राण्यांनी घोटा शेत शिवारातील शेतकऱ्यांच्या शेतातील सर्व पिके जमीन दोस्त केली.
शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला तळहाताच्या फोडाप्रमाणे आजवर जपले राखण केले, पण वन्यप्राण्यांनी पिक फस्त केले. सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे.वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी रिसोड तालुक्यातील घोटा शिवारामध्ये जाऊन प्रत्येक शेतकऱ्यांच्या नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करून तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी. पंधरा दिवसात काढणीस येत असलेल्या सोयाबीनला पिकाला रानडुकरांनी जमीन दोस्त करून शेतकऱ्याचे लाखोचे नुकसान झालेले आहे.
तरी तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे पंचनामे करून तात्काळ भरीव मदत द्यावी अन्यथा तालुक्यातील सर्व शेतकरी घेऊन वनविभागाच्या कार्यालयावर धडक मारू असा इशारा महाराष्ट्र क्रांतिकारी आघाडीचे नेते जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील मोरे यांनी दिला