rape news : बदलापूर badlaur शाळेतील लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजे असतानाच पुण्यात तशीच घटना घडली आहे. स्कूल व्हॅन चालकानेच दोन ६ वर्षीय अल्पवयीन मुलींसोबत लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. वानवडी पोलिसांनी ‘संजय जेट्टींग रेड्डी’ sanjay chettinng reddy (४५, वैदूवाडी, हडपसर) या व्हॅन चालकाला अटक केली आहे. पीडितांपैकी एक सहावर्षीय मुलगी नामांकित शाळेत शिकते. आरोपी संजय याच्या व्हॅनमधून मुलगी ये-जा करत होती. ३० सप्टेंबर रोजी ती शाळेतून घरी आली असता तिला काहीतरी त्रास होत असल्याचे आईला जाणवले. आईने जवळ घेऊन प्रेमाने विचारले असता तिने संजय अंकल हा रोज अश्लील चाळे करत असल्याचे व चार दिवसांपासून हा प्रकार मैत्रिणीबरोबर देखील सुरू असल्याचे सांगितले. मुलीचे वडील शाळेत गेले. तसेच दुसऱ्या चिमुरडीने देखील तेच सांगितले.