pm narendra modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील विज्ञान भवनात आंतरराष्ट्रीय ‘अभिधम्म दिन’ आणि पाली भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता दिल्याच्या समारंभाला हजेरी लावली. या कार्यक्रमाला संबोधित करताना ते म्हणाले की, जगाला युद्धात नाही तर बुद्धात समाधान मिळू शकते. जगाने शांततेच्या मार्गावर चालण्यासाठी बुद्धाच्या शिकवणीतून शिकले पाहिजे. जग अस्थिरतेने ग्रासलेले असताना बुद्ध केवळ प्रासंगिकच नाही तर गरजही आहेत, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान म्हणाले की, प्रत्येक देश आपला वारसा आपल्या ओळखीशी जोडतो, परंतु भारत या बाबतीत खूप मागे पडला आहे. ते म्हणाले की, स्वातंत्र्यापूर्वी आक्रमकांनी भारताची ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. नंतर गुलाम मानसिकतेने ग्रस्त असलेल्या लोकांनी हे केले. एका गटाने देश ताब्यात घेतला आणि आपल्या वारशाच्या विरुद्ध दिशेने नेला. पाली भाषेला अभिजात भाषा म्हणून मान्यता देणे ही भगवान बुद्धांच्या महान वारशाला श्रद्धांजली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भाषा हा सभ्यता आणि संस्कृतीचा आत्मा आहे. पाली भाषा जिवंत ठेवणे, भगवान बुद्धांचे वचन जिवंत ठेवणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.
भगवान बुद्धांशी जोडण्याचा जो प्रवास माझ्या जन्माच्या वेळी सुरू झाला तो आजही सुरू आहे हे माझे भाग्य आहे. माझा जन्म गुजरातमधील वडनगर येथे झाला. जे एकेकाळी बौद्ध धर्माचे प्रमुख केंद्र होते. गेल्या १० वर्षांत मला भारतातील ऐतिहासिक बौद्ध स्थळांपासून ते जगभरातील विविध देशांमध्ये अनेक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. नेपाळमधील भगवान बुद्धांच्या जन्मस्थानाला भेट देण्यापासून ते मंगोलियातील त्यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यापर्यंत मला संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.