खबरदार ! माझ्या बाबा विषयी बोलाल तर..जयश्री थोरात यांचा सुजय विखे पाटील यांना इशारा

 

 

जयश्री थोरात

 

 

 

खबरदार ! माझ्या बाबा विषयी बोलाल तर..जयश्री थोरात यांचा सुजय विखे पाटील यांना इशारा… संगमनेरकडे sangamner वाकड्या नजरेने बघायचे नाही, अशा शब्दात मंत्री आमदार ‘बाळासाहेब थोरात’ balasaheb thorat यांच्या कन्या जयश्री थोरात jayshree thorat  यांनी भाजपचे माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील dr. sujay bikhe patil  यांच्यावर पलटवार केला.

 

 

दोन दिवसांपूर्वी डॉ. सुजय विखे पाटील dr. sujay vikhe patil  यांनी संगमनेरमधील सभेत बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली होती. थोरात यांनी ४० वर्षे सेटलमेंटचे राजकारण केले. आम्ही चाळीस वर्षांची दहशत मोडून काढणार आहोत. माझ्या कार्यकर्त्यांना हात लावायचा प्रयत्न केला तर येथे येऊन गाडेन, असे विधान विखे यांनी केले होते. यासंदर्भात बोलताना जयश्री म्हणाल्या, थोरात सर्वांत जास्त काळ महसूलमंत्री राहिले. पण, कधी कुणाचे वाटोळे केले नाही. यांनी मात्र खोट्या केसेस करून लोकांना त्रास दिला.

 

 

मंत्री विखे पाटील काय म्हणाले?

जयश्री थोरात jayshree thorat यांच्या भाषणाबाबत राधाकृष्ण विखे-पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले, नासमज व्यक्तीविषयी मी काय बोलणार? बोलणारी मुले आहेत. त्यांना अजून समज यायची आहे..