nursing exam : धक्कादायक ! १४ तासापूर्वीच फुटला बुलढाण्यात नर्सिंग चा पेपर…बघा प्रशासनाचा सावळा गोंधळ.

 

nursing exam

 

 

 

nursing exam : जीएनएम GNM या द्वितीय वर्षाच्या वार्षिक परीक्षेचा ‘मेंटल हेल्थ’ विषयाचा पेपर फुटल्याची गंभीर बाब येळगाव येथील पैनगंगा नर्सिंग कॉलेज nursing college या परीक्षा केंद्रावर आज सकाळी सव्वा अकराच्या सुमारास उघडकीस आली. पेपर सुरू झाल्याच्या अवघ्या दहा मिनिटांतच विद्यार्थी कॉपी करायला भिडल्याचे केंद्रप्रमुखांच्या लक्षात आल्यानंतर केलेल्या तपासणीत पाच विद्यार्थ्यांच्या मोबाइलमध्ये प्रश्नपत्रिका आढळली. या प्रकरणात १४ विद्यार्थ्यांचे मोबाइल जप्त करून चौकशी सुरू करण्यात आली आहे.

 

 

 

पेपर सुरू होण्याच्या १४ तासांपूर्वीच विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पेपरची प्रश्नपत्रिका पोहोचली होती. या प्रकाराने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. जीएनएम या वैद्यकीय medical अभ्यासक्रमासाठी वार्षिक परीक्षा सुरू झाली आहे. या परीक्षेकरिता शासकीय व येळगाव yelgaon येथील पैनगंगा नर्सिंग कॉलेज अशी दोन परीक्षा केंद्रे होती. पैनगंगा याठिकाणी विद्यार्थ्यांनी कॉपी केली. शासकीय परिचारिका प्रशिक्षण केंद्राच्या मीना शेळके या केंद्रप्रमुख म्हणून कर्तव्यावर होत्या. कॉपीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पत्रकारांनी संपर्क केला असता मीना शेळके म्हणाल्या, मुंबईच्या एमएसबीएनपीए (महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ नर्सिंग अॅण्ड पॅरामेडिकल एज्युकेशन मुंबई) या बोर्डाकडून जीएनएम द्वितीय वर्षाचा ११ ते २ या वेळेत मेंटल हेल्थ हा पेपर सुरू होता.

 

 

 

११.१० मिनिटांनी एका विद्यार्थ्याने शर्टच्या बाहीवर कॉपी केल्याचे आढळले. अधिक चौकशी केली असता प्रश्नपत्रिकेवरील प्रश्न सारखेच आढळले. त्याच्याकडे अख्खा पेपरच मिळाला. त्यामुळे आणखी तपासणी केली असता एक विद्यार्थिनी व चार विद्याथ्यर्थ्यांनीही कॉपी केल्याचे निदर्शनास आले. विद्यार्थ्यांनी व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता. त्यात ९ ऑक्टोबरच्या रात्री पावणेनऊला पेपर आला होता. दरम्यान, १४ मोबाइलवर प्रश्नपत्रिका आढळल्याने ही मोबाइल हॅण्डसेट जप्त करण्यात आले आहे.

 

 

 

 

खासगी कॉलेजचे कॉपीबहाद्दर विद्यार्थी

नर्सिंगच्या पेपरला कॉपी करणारे जे कॉपीबहाद्दर आढळले, ते बुलढाण्यातील दोन आणि खामगाव येथील एका नर्सिंग कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी होते. आजचा जीएनएमचा द्वितीय वर्षाचा दुसरा पेपर होता. यापूर्वीच्या दोन विषयांचे पेपरहीदेखील फुटले असावेत, अशी चर्चा आहे.

चौकशी सुरू

नर्सिंग कॉन्सिल निर्णय घेईल या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे. १४ विद्यार्थ्यांकडून मोबाइल जप्त केले आहेत. त्यात प्रश्नपत्रिका आढळून आली. या प्रकाराबाबत नर्सिंग कॉन्सिलला कळविले आहे. चौकशीअंती पोलीस तक्रार अथवा पुढील कारवाईसंदर्भात कॉन्सिल निर्णय घेईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भागवत भुसारे यांनी सांगितले.