युवकांना नोकरीची सुवर्णसंधी..!! प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये नेमणार ३ नल जलमित्र.ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात.अर्जाची प्रक्रिया बघण्यासाठी बातमी वाचा.

 

कट्टान्यूज नेटवर्क

 

nal jal mitra : युवकांना नोकरीची सुवर्णसंधी..!! प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये नेमणार ३ नल जलमित्र. महाराष्ट्र राज्य जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजना  ची देखभाल व दुरुस्ती करीता प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गवंडी/प्लंबर, मेकॅनिक/फिटर  व इलेक्ट्रिशियन/पंप दुरुस्ती ऑपरेटर अशा एकूण तीन पदासाठी नल जलमित्र म्हणून प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये नेमणूक केली जाणार आहे.

 

 

महाराष्ट्र राज्य जल मिशन अंतर्गत योग्य रीतीने पाणीपुरवठा व योजनेची देखभाल व पाणीपुरवठा मध्ये काही अडचण आल्यास वेळेवर दुरुस्ती व्हायला हवी म्हणून कुणाला जलमित्र म्हणून यांची निवड केली जाणार आहे.गवंडी/प्लंबर, मेकॅनिक/फिटर  व इलेक्ट्रिशियन/पंप दुरुस्ती ऑपरेटर या तीन पदासाठी प्रत्येक ट्रेड साठी तीन असे एकूण नऊ उमेदवारांची नामनिर्देशन करण्यासाठी ग्रामपंचायत ने ॲपवर माहिती भरायची आहे.

 

 

वरील माहिती भरलेल्या उमेदवारांची उच्चतम श्रेणी बघून राज्यस्तरावरुन निवड केली जाणार आहे. व त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदरील पदासाठी ग्रामसेवक यांनी २६ सप्टेंबर पर्यंत अर्ज भरून घ्यायचे आहेत.

 

नल जलमित्र पदासाठी अर्ज करण्याची पद्धत

 

ग्रामसेवकांनी २६ सप्टेंबर पर्यंत उमेदवारांचे अर्ज प्राप्त करून घेऊन गुणवत्ता यादीनुसार अनुक्रमे विहित नमुन्यातील पत्राद्वारे तयार करून त्याचे आयडेंटी साईज फोटो, आधार कार्ड आणि शैक्षणिक पात्रतेचे कागदपत्र संबंधित पंचायत समिती येथे सादर करावयाची आहे. त्यानंतर त्यांची प्रि-स्क्रिनिंग टेस्ट राज्यस्तरावरून करण्यात येणार आहे. एक ट्रेडसाठी एक उमेदवार प्रमाणे अंतिम ९ पैकी ३ उमेदवार निवड करण्यात येणार आहेत.