Nagpur rape : फ्रुटीतून गुंगीचे औषध देत दीड महिन्याअगोदर ओळख झालेल्या एका तरुणीवर अत्याचार करण्यात आला. कपिलनगर kapilnagar पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तरुणीसोबत हा प्रकार घडला. अब्दुल मजीद अब्दुल वहु abdul majid abdul vahu (२९, कब्रस्तान रोड, मोमिनपुरा) असे आरोपीचे नाव आहे. त्याची दीड महिन्याअगोदर एका मुलीच्या माध्यमातून पीडित तरुणीसोबत ओळखी झाली. त्याने तिला सातत्याने फोन करून जाळ्यात ओढले.
११ जुलै रोजी तो तिला भेटण्यासाठी ‘गांधीबाग बगीच्यात’ gandhibag bagicha गेला तेथे त्याचि मैत्रीण व त्याचा मित्र इम्रान imran हेदेखील होते. तेथून ते सिनेमा पाहायला गेले. मात्र तो अर्ध्यातूनच सोडून कपिलगर पोलिस ठाण्याच्या kapilnagar police station हद्दीतील एका हॉटेलमध्ये hotel खाण्यासाठी गेले. तेथे एका रूममध्ये अब्दुल abdul तिला घेऊन गेला.
त्याने तिला फ्रुटी व चिप्स fruiti chips दिले. ते खाल्यावर तरुणीला गुंगी आली. त्यानंतर अब्दुलने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकाराने हादरलेल्या तरुणीने तिच्या बहिणीला माहिती दिली. बहीण तिला यशोधरानगर पोलिस ठाण्यात yashodha nagar police station घेऊन गेली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी अब्दुलविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे