nafed | अधिकारी व व्यापारी यांची साखळी तयार होऊन नाफेडच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होत असलेली फसवणूक तसेच ‘नाफेड’ शिवाय ‘एनसीसीएफ’च्या कांदा खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांनी फिरविलेली पाठ याचा पंचनामा नाफेडचे nafed अध्यक्ष जेठाभाई अहीर यांनी केला. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील नाफेडच्या कांदा खरेदी-विक्री केंद्रांवर अचानक पाहणी केली. या पाहणीत त्यांना अनेक दोष आढळून आले. अध्यक्षांकडून कांदा खरेदी केंद्रांची पाहणी होत असल्याची भनक नाफेडशिवाय कृषी अधिकाऱ्यांनाही लागली नाही.
खासगी दौऱ्याचे कारण सांगून अध्यक्ष नाशिक जिल्हा दौऱ्यावर आले होते. देवळा येथील नाफेडच्या कांदा खरेदी केंद्रावर अध्यक्ष जेठाभाई अहीर शुक्रवारी सकाळी पोहोचले. त्यामुळे तेथे उपस्थित नाफेडच्या अधिकाऱ्यांची धावपळ उडाली. आतापर्यंत खरेदी केलेल्या कांद्याचा हिशेब अध्यक्षांनी तपासला. तसेच शेतकऱ्यांचा प्रतिसाद कमी का झाला? म्हणून विचारला. अधिकाऱ्यांनाही जाब चौकशीसाठी कमिटी नेमणार नाफेडच्या खरेदी केंद्रांवर काही दोष आढळून आल्याने संपूर्ण चौकशीसाठी कमिटी नेमण्यात येणार आहे. त्यानुसार कमिटी आपला अहवाल सादर करेल.
nafed चौकशीत काय आढळून आले ?
■ शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी न करता बाजार समितीतून कांदा खरेदी केला जात होता.
■ ऑनलाइन कांदा खरेदी विक्रीमध्ये घोटाळा आहे का? याचे बारकावे अध्यक्षांनी तपासले.
■ विक्रीस आलेल्या मालापेक्षा दुप्पट कांदा गोडावूनमध्ये आढळून आला.
■ ५ ते ६ खरेदी केंद्रांवर चुकीच्या पद्धतीने काम सुरू असल्याचे दिसले.
■ आधार कार्डवर शिक्के मारून ऑनलाइन खरेदी-विक्री व्यवहारात गडबडीचा संशय.
■ कांदा खरेदी-विक्री व्यवहारात दलाली होत असल्याचा अध्यक्षांना संशय,
अध्यक्षांनी nafed पाहणी केल्यानंतर लगेचच भावात वाढ.
• अध्यक्षांच्या अचानक पाहणी दौऱ्यानंतर शुक्रवारचे कांद्याचे दर नाफेडच्या केंद्रांवर थेट ३,०७४ पर्यंत गेले.
• हा यंदाचा भावाचा उच्चांक आहे. पहिल्या दिवसापेक्षा २०० रुपयांची भाववाढ झाली.