मेहकर | ९ मार्च २०२६
बुलढाणा पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या एका ५६ वर्षीय पोलिस नाईकाने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ८ मार्च रोजी सकाळी उघडकीस आली असून संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पंजाबराव भीमराव शेळके (वय ५६) हे बुलढाणा येथे पोलिस नाईक पदावर कार्यरत होते. ते मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम येथील रहिवासी होते. शनिवारी रात्री त्यांनी मेहकर-चिखली रोडवरील मेहकर भाग क्रमांक २ परिसरातील शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
रविवारी सकाळी बाभूळखेड फाट्यानजीकच्या लाड यांच्या शेतातील विहिरीत एका पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. यानंतर सरपंच शंकर गायकवाड व गावकऱ्यांनी तात्काळ मेहकर पोलिसांना माहिती दिली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. प्रथमदर्शनी हा आत्महत्येचा प्रकार असल्याचे सांगण्यात येत असले तरी आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पंजाबराव शेळके यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
या प्रकरणी अमोल म्हस्के यांनी मेहकर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. पुढील तपास मेहकर पोलिसांकडून सुरू आहे.
Related News
- धक्कादायक! शिक्षिका पत्नीचा अपघात नसून सुपारी देऊन खून; पतीसह दोघे अटकेत
- दारूड्या भावाच्या मित्राला “घरी जा” म्हटल्याने वाद; लहान भावाने चाकूने भोसकून मोठ्या भावाचा खून
- आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा गेला… सुलतानपूरमध्ये 24 वर्षीय बेरोजगार युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
अशाच ताज्या व विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.










