मेहकर येथून समृद्धी महामार्गे अवैध रेती वाहतूक ; ३ वाहतूक जप्त !

 

मेहकर

 

 

 

मेहकर येथून समृद्धी महामार्गे अवैध रेती वाहतूक ; ३ वाहतूक जप्त !  मेहकर ‘तहसीलदार’ तथा प्रभारी उपविभागीय महसूल अधिकारी निलेश मडके यांनी गुप्त माहितीच्या आधारे ११ ऑक्टोबरच्या रात्री कारवाई करीत अवैध रेती वाहतूक करणारे 3 टिप्पर पकडले. याप्रकरणी मेहकर mehkar पोलिसांनी टिप्पर चालकाविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. मेहकर येथून समृद्धी मार्गे  रेती वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार यांना मिळाली होती.

 

 

 

 

त्या नुसार तहसीलदार यांनी एक पथक घेऊन ११ ऑक्टोबरच्या रात्री दरम्यान समृद्धी महामार्गाकडे जात असतांना त्यांना वाटेत एक भरधाव वेगाने जात असलेला टिप्पर दिसून आला सदर वाहनाचा पाठलाग केला असता सदर वाहन कंचणी महाल समोरील गजानन महाराज विसाव्याकडे जाणाऱ्या कच्या रस्त्याने जात होते. थोड्या अंतरावर गेल्यावर एक बुलेट व एक स्प्लेंडर गाडी येऊन तहसीलदार यांच्या वाहना समोर आडवी लावली व त्यांनी वाद घालण्यास सुरवात करत टिप्पर चालकाला फोनवर रेती खाली करून पळून जाण्याच्या सूचना दिल्या तर तेव्हा तहसीलदार त्यांचे पथक यांनी इतर दोन टिप्पर जे भालेगाव या गावात जावून लपल्याची माहिती मिळाल्याने गाडीच्या टायरचे खुणाव सांडलेली रेती यावरून टिप्परचा शोध घेणे सुरु केले.

 

 

 

 

तो परियंत मेहकर पोलीस सुद्धा भालेगाव येथे येऊन पोचले तेव्हा संजय निकम यांच्या गोठ्या जवळ तीन तीन ब्रास रेतीचे दोन गंज दिसून आले व गोठ्या मागे दोन तनुकतेच उभे केलेले दोन टिप्पर मिळून आले यात विशेष म्हणजे दोन्ही टिप्पर विना नंबरचे होते. याप्रकरणी मेहकर पोलिसांनी सदर टिप्परच्या चेंचीस नंबर वरून गुन्हा नोंदविला. ही कारवाई तहसीलदार तथा प्रभारी उपविभागीय महसूल अधिकारी निलेश मडके, नायब तहसीलदार सदानंद पिसे, नायब तहसीलदार अजय जोहरे व पोलीस कर्मचारी यांनी केली.