mehkar : धक्कादायक ! वासनेचा शैतान डोक्यात गेल्यावर माणूस काय करेल सांगता येत नाही असेच एका वासनाधीन नराधमाने त्याच्या शरीरात उत्पन्न झालेली लैंगिकतेची आग शमविण्यासाठी चक्क ६५ वर्षीय महिलेवर ‘लैंगिक अत्याचार’ केल्याची खळबळजनक घटना २७ सप्टेंबरच्या रात्री शहरातील इंदिरानगर indiranagar परिसरात घडली. लिंगपिसाट आरोपीविरुध्द मेहकर मेहकर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वासना डोक्यात शिरली की, ती शमविण्यासाठी कोण काय करेल, हे सांगताच येत नाही.
स्थानिक इंदिरानगर indiranagar परिसरात राहणाऱ्या शेख हसन shekh hasan (वय ४८ वर्षे) नामक वासनांध लिंगपिसाटाची नजर याच परिसरात राहणाऱ्या एका ६५ वर्षीय पीडितेवर गेली. आपली वासना शमविण्यासाठी हा नराधम २७ सप्टेंबरच्या रात्री अंदाजे दोन-अडीचच्या सुमारास पीडितेच्या घरात घुसला. पीडितेस जीवाने ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर अत्यंत कुरतेने लैंगिक अत्याचार केला. नराधम देत असलेल्या वेदना सहन न झाल्याने पीडिता बेशुध्द पडली. त्यानंतर आरोपीने तिच्या पिशवीतील नगदी ५ हजार रूपये चोरून पोबारा केला. याप्रकरणी पीडिताने २९ सप्टेंबर रोजी मेहकर पोलीस स्टेशन गाठून घडलेली हकिकत पोलिसांना सांगितली. पोलिसांनी आरोपी शेख हसन याच्या विरुध्द लैंगिक अत्याचारासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप बिरांजे हे करीत आहेत