अभिमानास्पद ! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ; मराठीसह आणखी पाच भाषांना अभिजात दर्जा

मराठी

 

 

 

अभिमानास्पद ! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा ; मराठीसह आणखी पाच भाषांना अभिजात दर्जा… मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा दर्जा’ देण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळावे याला मंजूरी दिली आहे. मराठी भाषेबरोबरच पाली, प्राकृत, असमिया आणि बंगाली भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ही मोठी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे.

 

 

 

केंद्र सरकारचा हा निर्णय महाराष्ट्राच्या साहित्यांकांना प्रोत्साहन देणारा आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने मराठी भाषेसह आणखी पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. केंद्र सरकारने मराठीसह बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव ashwini vaishnav यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर याबाबतची माहिती दिली. आमच्याकडे आतापर्यंत ज्या नोटिफाईड अभिजात भाषा होत्या.

 

 

 

केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

आता ज्या नव्या भाषा येतील त्यांनाही याच फ्रेमवर्कमध्ये बसवलं जाणार आहे’, अशी प्रतिक्रिया अश्विनी वैष्णव ashwini vaishnav यांनी दिली.

पाली, प्राकृत, असमिया आणि बंगाली देखील आता अभिजात भाषा

 

 

 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस devendra fadnvis  यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस ! मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील १२ कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो.