latest news : १० वर्षे दोंघाच्या संमतीने संबंधात ; मग आता बलात्कार कसा ?

latest news

latest news : १० वर्षे एका पुरुषासोबत नात्यात राहणाऱ्या महिलेने दाखल केलेला बलात्काराचा खटला मध्य प्रदेश mdhya pradesh उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविला.कटनी येथे नोव्हेंबर २०२१ मध्ये एका पुरुषाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. याविरोधात त्याने न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने याप्रकरणी म्हटले की, त्यांनी संमतीनेच १० वर्षांपेक्षा जास्त काळ शारीरिक संबंध ठेवले. पुरुषाने लग्नास नकार दिला. मात्र, यामुळे त्याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने म्हटले.

 

 

 

 

प्रकरणाला बलात्कार म्हणू शकत नाही

न्यायालयाने म्हटले की, महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत तसेच तिने नोंदविलेल्या जबाबानुसार हे प्रकरण बलात्काराच्या व्याख्येत बसत नाही. हे काहीही नसून निव्वळ कायद्याचा अपमान आहे. याप्रकरणात लग्नाचे आमिष दाखवून ‘बलात्कार‘ केल्याचाही खटला चालविता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.