“लाडक्या बहिणीचे पैसे आले की नाही पाहण्यासाठी बँकेत तुफान गर्दी”,अधिकारी,कर्मचारी त्रस्त.

 

 

नारायणराव आरु पाटील/ प्रतिनिधी 

 

लाडक्या बहिणीचे पैसै आले की नाही हे बघण्यासाठी दाजींची गर्दी.रिसोड तालुक्यातील रिठद या गावात बँक ऑफ महाराष्ट्रची शाखा असून या शाखेस सावरगाव जिरे येथील शाखा बंद केल्याने रिठद शाखेस जोडलेले ग्राहक व सावरगाव जिरे अंतर्गत असलेल्या गावातील ग्राहकांची संख्या वाढल्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची पैसे मिळण्यास सुरू झालेल्या पैशाची तपासणी करण्याकरिता व आपल्या खात्याशी आधार लिंक आहे की नाही, खात्याशी मोबाईल क्रमांक जोडला किंवा नाही, याबाबतच्या तपासण्या करण्यासाठी सर्वच महिला रिठद बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत या महिलांची तुफान गर्दी वाढल्याने शाखाप्रबंधक अवचार व त्यांचे सर्व सहकारी महिलांना उत्तरे देऊन कंटाळले असून कोणाला काय उत्तर द्यावे समजेनासे झाले.

 

 

बँक ऑफ महाराष्ट्र शाखे खाते असलेल्या महिलांचे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत दहा टक्के महिलांचे पैसे आलेत, परंतु इतरही महिला आमचे पैसे का आले नाहीत? मोबाईल बरोबर नंबर आहे की नाही, आधार लिंक आहे की नाही, केवायसी केली की नाही इत्यादी प्रश्नाचा बँक कर्मचाऱ्यांना भडीमार करत आहेत. त्यामुळे कुणाला काय उत्तर द्यावे हे कळेनासे झाले. या बाबीचे नियोजन वरिष्ठ स्तरावर व्हायला हवे व महिलांनी आपल्या मोबाईल मध्ये मेसेज आल्याशिवाय बँकेत पैसे काढण्यासाठी येऊ नये व विनाकारण गर्दी करु नये.

 

 

काही महिलांचे इतर बँकेतही किंवा पोस्टातही खाते आहेत इतर शाखेत किंवा बँकेत आधार लिंक असल्यामुळे पैसे इतर बँकेत जातात अशाही महिला या बँकेत गर्दी करत आहेत. इतरही बँकेत किंवा पोस्ट ऑफिस मध्ये तपासणी केल्याशिवाय बँकेत गर्दी करू नये असे आवाहन शाखाधिकारी यांनी केले आहे.