वाशिम : अशोक नगर प्रभाग तिन मधील शासकीय रस्ता फोडून अतिक्रमण करणाऱ्यावर कार्यवाहीची मागणी.

मालेगाव

 

 

वाशिम जिल्हा प्रतिनिधी/नारायणराव आरु पाटील

 

मालेगाव (malegaon) शहरातील अशोक नगर प्रभाग तीन येथे शासनाच्या निधीतून बनलेल्या गट्टू रस्ता फोडून त्यावर अतिक्रमण करण्याच्या व्यक्तीचे नावे दिपक पखाले, अतिश पखाले, निलेश पखाले, आकाश पखाले या व्यक्ती वर कारवाई करून रस्ता येण्या जाण्याचा मोकळा करावा म्हणून २२ ऑक्टोंबर दुपारी दोन वाजता नगरपंचायत मुख्यधिकारी यांना दिले निवेदन

 

 

 

नगरपंचायत मालेगाव येथे दिलेल्या निवेदनात अशोक नगर प्रभाग तीन मधील येण्या- जाण्याचा रस्त्यावर शासनाने बसवलेल्या रस्त्यावरील गट्टू लंपास करून जे लोक चाळीस वर्षापासून ये-जा करणाच्या रस्त्यावर अतिक्रमण करून संपूर्ण रस्ता बंद केला आहे त्यामुळे नगरपंचायतने त्वरित कारवाई करून शासनाचा रस्ता हडप करणाऱ्या चार व्यक्तीवर नगरपंचायत बांधकाम विभाग आधी नियमानुसार त्वरित कार्यवाई करण्याची मागणी निवेदन कर्ते चंद्रकांत गायकवाड यांनी नगरपंचायत मुख्याधिकारी यांना दिले निवेदन. तसेच प्रभिग तीन मध्ये अतिक्रमण चालू असल्याबाबत सी.ई.ओ. नगरपंचायत यांना भ्रमणध्वनी वरून माहिती देण्यात आली. होती. मुख्याधिकारी काय कार्यवाही करतात याकडे प्रभागातील जनतेचे लक्ष लागले आहे.