मुंबई/प्रतिनिधी
Ladki bahin yojana : लाडक्या बहिणीला खरंच दिवाळी बोनस मिळणार का..?? बघा काय आहे खरी बातमी..!! महाराष्ट्र सरकारने महिलांना आर्थिक सक्षम करण्याकरिता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलात आणली आहे. या योजनेसाठी ४६ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, तर आतापर्यंत राज्यात २ कोटी २६ लाखांहून अधिक बहिणींच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. दरम्यान, सरकारकडून आता लाडक्या बहिणींना (ladki bahin yojana) दिवाळी बोनस मिळणार असल्याचेही वृत्त पसरले आहे. काही निवडक महिलांनाच दिवाळी बोनस मिळणार असल्याचेही या वृत्तांमधून सांगण्यात आले.
मात्र, महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या कार्यालयाशी साधलेल्या संवादानुसार, लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांना दिवाळी बोनस देण्याबाबत कोणताही शासन निर्णय झालेला नसल्याची माहिती देण्यात आली आहे. बोनसबाबतचे वृत्त खोटे असून सरकारकडून अशी कोणतीच घोषणा झालेली नसल्याचे आदिती तटकरे यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.