School : विनाअनुदानित अंशतः अनुदानित शिक्षक व कर्मचारी यांनी दिले मा. शिक्षणाधिकारी व जिल्हाधिकारी यांना निवेदन.

School
School

 

गंगाधर बोरकर , वाशिम– (kattanews network )अंशतः अनुदानित (school) शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना 1 जानेवारी 2019 पासून विनाअठ प्रतिवर्षी पुढील टप्पा लागू करणे बाबत.जुलै 2024 रोजी माननीय शिक्षण मंत्री यांनी टप्पा वाढ अनुदानाबाबत  घोषणा केली होती.परंतु प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली नाही.

 

 

प्रतिवर्षी टप्पा वाढ देण्याचे लेखी आश्वासन दिले तसेच संदर्भ क्रमांक दोन च्या विधानभवनातील घोषणेनुसार एक जून 2024 पासून टप्पा वाढ देऊन अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली होती तरी संदर्भ क्रमांक एक व दोन नुसार 30 जुलै पूर्वी शासन निर्णय निर्गमित करून तात्काळ शिक्षक व शिक्षकेतर यांच्या खात्यावर पगार जमा करावी.

 

 

व तसेच औषध ऑनलाईन शाळेतील शिक्षक शिक्षिका कर्मचारी यांना एक जानेवारी 2024पासून विनाअट 2023-24 च्या संच मान्यतेनुसार पुढील टप्पा देऊन प्रतिवर्षी टप्पा लागू करणे.या मागणीसाठी दिनांक 24 सात 2024 रोज बुधवारपासून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय व शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक कार्यालय जिल्हा परिषद वाशिम येथे लाक्षणिक धरणे सुरु आहे . त्यासंर्भात शिक्षणाधिकारी साहेब व जिल्हाधिकारी वाशिम यांना श्री जी एस बोरकर जिल्हाध्यक्ष स्वराज्य शिक्षक संघटना वाशिम श्री प्रशांत कव्हर जिल्हाध्यक्ष उच्च माध्यमिक शिक्षक संघटना वाशिम. यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.

 

 आंदोलनाच्या प्रमुख मागण्या

1. शासन निर्णय 12 15 व 24 मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्रुटी पूर्तता केलेल्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्याना समान टप्पा वाढ देणे.

2. राज्यातील पुणे स्तरावरील अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करणे

3. 30 जुलै 2024 पर्यंत टप्पा वाढ सह अन्य मागण्यांचा शासन आदेश निर्गमित करून आचारसंहितापूर्वी किमान एक महिन्याचा वाढीव टप्प्याचा पगार शिक्षकांच्या खात्यावर जमा करणे