हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

दारूड्या भावाच्या मित्राला “घरी जा” म्हटल्याने वाद; लहान भावाने चाकूने भोसकून मोठ्या भावाचा खून

On: March 8, 2026 9:37 AM
Follow Us:
खामगाव तालुक्यातील सुटाळा बु. येथे लहान भावाने चाकूने वार करून मोठ्या भावाचा खून
Advertisement परिवर्तन अकॅडमी लातूर – पोलीस भरती, आर्मी भरती, स्टाफ सिलेक्शन
खामगाव | ८ मार्च २०२६ 

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील सुटाळा बु. येथे सख्ख्या भावांमधील वादातून खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दारूच्या नशेत घरी आलेल्या भावाच्या मित्राला “तुझ्या घरी जा” असे सांगितल्याने दोन भावांमध्ये वाद झाला. हा वाद इतका वाढला की संतापाच्या भरात लहान भावाने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने मोठ्या भावाच्या पोटात वार करून त्याचा खून केला. ही घटना ५ मार्च रोजी दुपारी सुमारे ३ वाजताच्या सुमारास घडली असून शिवाजी नगर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुटाळा बु. ता. खामगाव येथील देविदास महादेव गायकी (वय २८) हा ५ मार्च रोजी दुपारी आपल्या एका मित्रासह दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी देविदासचा लहान भाऊ मंगेश महादेव गायकी (वय २५) याने देविदासच्या मित्राला “तुझ्या घरी निघून जा” असे सांगितले. यावरून दोन्ही भावांमध्ये जोरदार वाद सुरू झाला.

वाद वाढत जाऊन दोघांमध्ये मारहाण झाली. या झटापटीदरम्यान देविदासने हातातील कड्याने मंगेशच्या डोक्यात मारल्याने तो जखमी झाला. त्यामुळे संतापलेल्या मंगेशने घरातील भाजी कापण्याचा चाकू आणून देविदासच्या पोटात वार केले. गंभीर जखमी झालेल्या देविदासचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या प्रकरणी मृतक देविदास यांची आई लिलाबाई गायकी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मंगेश गायकी याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता कलम १०३(१) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, राहूड ता. खामगाव येथे सुमारे १५ दिवसांपूर्वीही सख्ख्या भावाने लहान भावाचा खून केल्याची घटना घडली होती. त्यामुळे खामगाव तालुक्यात गेल्या पंधरा दिवसांत सख्ख्या भावांमधील वादातून खून होण्याची ही दुसरी घटना ठरली असून परिसरात खळबळ उडाली आहे.


हे पण वाचा..

मेहकर MIDC परिसरात युवकाचा दगडाने ठेचून खून; प्रेमप्रकरणाची चर्चा
बिबी येथे दिवसा घरफोडी; आरोपी रंगेहात पकडला
मेहकर पंचायत समितीवर गंभीर आरोप; रोजगार हमी योजनेचे पैसे रखडले, सरपंच दत्ता गवईंचा उपोषणाचा इशारा


हे आवश्यक करा.

आपल्या परिसरातील ताज्या गुन्हेगारी, राजकीय व सामाजिक घडामोडींसाठी Kattanews.in नियमित वाचा आणि ही बातमी आपल्या मित्रांपर्यंत जरूर शेअर करा.

विशाल गवई

विशाल गवई हे चिखली तालुका प्रतिनिधी असून बुलढाणा, महाराष्ट्र येथील स्थानिक बातम्यांचा सखोल कव्हरेज करतात. ते ५ वर्षांहून अधिक पत्रकारितेत अनुभव आहेत आणि स्थानिक प्रशासन, ग्रामस्थ आणि समाजकार्याच्या घडामोडींवर लक्ष ठेवतात. वाचकांना त्यांच्या बातम्यांमधून नेमकी आणि विश्वासार्ह माहिती मिळते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

कवी अजीम नवाज राही साखरखेर्डा येथे लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार 2025 निमित्त सत्कार

साखरखेर्डा गावाचा अभिमान! ‘वळीवाच्या वेळा’ कवितासंग्रहासाठी कवी अजीम नवाज राही यांना लोकनेते राजारामबापू पाटील उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार 2025

जलजीवन योजना बुलढाणा उत्राडा गाव पाणी टाकी निकृष्ट काम आंदोलन

जलजीवन योजनेतील निकृष्ट कामाचा आरोप; उत्राडा येथील पत्रकार 20 मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणावर

बुलढाणा जिल्ह्यातील बीबी येथे शिक्षकाच्या घरात चोरी करताना आरोपी पकडला

दिवसा घरफोडीचा प्रयत्न फसला! बीबीमध्ये शिक्षकाच्या घरात चोर रंगेहात पकडला

मेहकर पंचायत समिती रोजगार हमी योजना मस्टर रखडले सरपंच दत्ता गवई उपोषण इशारा

मेहकर पंचायत समितीवर गंभीर आरोप; रोजगार हमी योजनेचे पैसे रखडले, सरपंच दत्ता गवईंचा उपोषणाचा इशारा

मेरा बुद्रुक गावातील एक गाव एक होळी परंपरेतील होलिका दहन सोहळा – बुलढाणा जिल्हा

“एक गाव एक होळी” परंपरा कायम! मेरा बुद्रुकमध्ये शेकडो वर्षांची संस्कृती आजही जिवंत

पांगरी काटे येथील संकेत इंगळे यांची TA Army मध्ये निवड

बस चालकाच्या मुलाची मोठी कामगिरी! पांगरी काटे येथील संकेत इंगळे ‘TA Army’ मध्ये निवड

Leave a Comment