मेहकर मध्ये जिजामाता करिअर अकॅडमी उघडून, युवकांना सैन्यामध्ये भरती करून देण्याचे आमिष दाखवून केली कोट्यवधी रुपयांनी फसवणूक.

 

 

कट्टा न्यूज / मेहकर प्रतिनिधी

 

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे जिजामाता करिअर अकॅडमी (jijamata career academy mehkar) या नावाने बोगस अकॅडमी उघडून युवकांना सैन्य व पोलीस दलाचे भरतीपूर्व प्रशिक्षणा सोबतच  सैन्यामध्ये व पोलीस दलामध्ये नोकरी देण्याचे आमिष दाखवून एक-दोन नव्हे तर तब्बल ४० गोरगरिबांच्या मुलांना तब्बल १ कोटी ४० लाख रुपयांनी गंडवल्याची खळबळजनक घटना ५ सप्टेंबर रोजी उघडकीस आली.

 

 

 

सविस्तर वृत्त असे की प्रदीप खिल्लारे याने मेहकर येथे जिजामाता करिअर अकॅडमी या नावाने बोगस अकॅडमी सुरू केली होती या अंतर्गत तो युवकांना पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण द्यायचा. यासोबतही त्याने गोरगरिबांच्या मुलांकडून नोकरीला लावतो असे आमीष दाखवले व २०१९ ते २०२१ या कालावधीत तब्बल एक-दोन नव्हे तर ४० युवकांना खोट्यावधी रुपयांनी गंडवले . त्याच्यासोबत पत्नी पूजा खिल्लारे, प्रशांत खिल्लारे, वडील एकनाथ रंगनाथ खिल्लारे, व आई रत्नमाला खिल्लारे हे सुद्धा त्याचे साथ देत होते. प्रदीप खिल्लारे व त्याचे संपूर्ण कुटुंब मेहकर येथील नगरपरिषद शाळा क्रमांक ५ जवळच राहतात.

 

 

 

आरोपी प्रदीप खिल्लारे याने मेहकर येथील राजीव गांधी व्यापारी संकुल येथे जिजामाता करिअर अकॅडमी या नावाने कार्यालय सुरू केले होते. परंतु या अकॅडमीची कुठलीही नोंदणी नसताना सुद्धा प्रदीप खिलरे यांने आपले कार्यालय थाटले होते. नोकरीची विचारणा केली असता विश्वास ठेवा नियुक्त पत्र आणून देतो असे प्रदीप खिल्लारे सांगत होता. व नेहमी टाळाटाळ करत होता ज्यावेळेस आपली फसवणूक झाल्याचे युवकांच्या लक्षात आले तेव्हा आपले पैसे परत मागण्यासाठी मागणी केली असता प्रदीप खिल्लारे हा ॲट्रॉसिटीच्या धमक्या देत असल्याचे दिसून आले.

 

 

 

याप्रकरणी मिलिंद नगर, मेहकर येथील चिक्रुल्ला गुलाब शेख या युवकाने मेहकर पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल केली. यानुसार मेहकर पोलिसांनी कलम ४२०,५०६,३४ नुसार गुन्हे दाखल करून आरोपी प्रदीप खिल्लारे यास अटक केली आहे व बाकीचे आरोपी फरार आहेत.