jammu : जवानांवर अचानक हल्ला या गमिनी काव्यात पाकिस्तानचे माजी सैनिकही सहभागी…

jammu

jammu : गेल्या दोन वर्षांपासून जम्मू jammu भागामध्ये ‘दहशतवादी’ अचानक हल्ले करत असून, गनिमी काव्याने आपल्या घातपाती ghatpat कारवाया करीत आहेत. त्यांनी बदललेल्या या रणनीतीचा मुकाबला करताना लष्कराचे ५२ जवान शहीद झाले. पाकिस्तानातील माजी सैनिकांच्या नेतृत्वाखाली हे दहशतवादी सीमेपलीकडून भारतात india  घुसखोरी करून हिंसाचार करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

 

 

 

जम्मूतील jammu सर्व जिल्ह्यांमध्ये घातपाती कारवाया करण्यासाठी सीमेपलीकडून दहशतवादी आले असल्याची माहिती आहे. मात्र, त्यांची संख्या किती हे भारतीय गुप्तचर यंत्रणांना अद्याप कळू शकलेले नाही, असे सांगण्यात आले. कठुआ, राजौरी, पुंछ, दौडा, भद्रवाह, उधमपूर, किश्तवाड येथे गेल्या दोन वर्षांत दहशतवाद्यांनी सुरक्षा जवानांवर अचानक हल्ले केले आहेत. त्यावेळी दहशतवादी अमेरिकी बनावटीच्या एम.४ कार्बाइनचा वापर करतात.

 

 

 

शोध सुरूच

राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी sundarbani क्षेत्रात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ बुधवारी रात्री संशयास्पद हालचाली आढळल्याने त्या दिशेने सुरक्षा जवानांनी गोळीबार केला.

गुरुवारी सकाळी या भागात शोध घेतला असता जवानांना तिथे संशयास्पद असे काही आढळून आले नाही. दोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम उघडण्यात आली आहे.

खबरे बोलतात…

■ या भागात लष्कराचे खबरे होते त्यांच्याकडे काही प्रमाणात लष्कराचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे या खबऱ्यांकडून मिळणारी गोपनीय माहितीही आटली आहे.

■ त्याचा फटका बसत आहे. असे मतही व्यक्त होत आहे. ड्रोनपेक्षा मानवी टेहळणी अधिक महत्त्वाची आहे, असे अधिकाऱ्यांना वाटते.