
khamgaon news : तब्बल ‘अठरा लाखांनी’ गंडविल्या गेल्याने, तसेच काही रक्कमेसाठी अपमानजनक वागणूक मिळाल्याने आपल्या पतीने आत्महत्या केल्याचे शिक्षकांच्या पत्नीने तक्रारीत नमूद केले. या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी पाच जणांसह दोन अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल केला. तक्रारीनुसार, संध्या शिवाजी ढगे यांचे पती शिवाजी एकनाथ ढगे shivaji ekanath thage शिवाजी शिर्ला नेमाने येथील जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून नोकरीवर होते. त्यांचे जळका तेली येथील राहुल बुधराम खंडेराव यांच्याशी चांगले संबंध होते.
त्यामुळे शिवाजी ढगे shivaji dhage यांनी राहुल खंडेराव rahul khaderao याला अठरा लाख रुपये उसनवारीने दिल्याचे म्हटले आहे. पैसे परत मागितले. मात्र, खंडेराव khanderao याने पैसे परत केले नाहीत. परिणामी, पतीला कर्जबाजारी होण्याची वेळ आली. दरम्यान, इतरांकडून कर्ज घेऊन व्यवहार करावे लागले. यात डॉ. विश्वंभर देवमन झाडोकार रा. रोकडियानगर शेगाव, यांच्याकडून एक लाखांचे कर्ज घेतले होते. पैसे चुकते केल्यानंतरही डॉ. झाडोकार कैलास साखरे kailas sakhare आणि जमील सेठ ऊर्फ जम्मू साहेब jammu saheb यांनी पैशांसाठी तगादा लावत अपमान केला. तसेच गजानननगरी घाटपुरी gajajnangri येथील विनोद रामसुंदर पांडे यांच्याकडून दीड लाख रुपये व्याजाने घेतले होते. ते व्याजासह परत केल्यानंतरही पांडे आणि डॉ. झाडोकर कैलास साखरे आणि इतर अनोळखी लोकांना पैशांसाठी घरी आणि शाळेत पाठवित होते.
या लोकांनी शाळेत शिक्षकांसमोर अपमान केल्याचेही पतीने सांगितले होते, त्यांच्या त्रासापायीच त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप तक्रारीत केला. खंडेराव याने १८ लाखांनी गंडविल्याने आर्थिक परिस्थिती खालावली. त्याने वेळेवर पैसे न दिल्याने इतर सावकारांकडून त्यांना व्याजाने पैसे घ्यावे लागल्यानेच ढगे यांनी आत्महत्या केल्याच्या तक्रारीवरून जलंब पोलिसांनी राहुल खंडेराव याच्यासह इतरांविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०८, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास जलंब पोलिस करीत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. तसेच आरोपीवर कडक कारवाइची मागणी होत आहे.