Hardik pandya : टी-२० विश्वचषकाच्या t20 world cup अंतिम सामन्यातील अंतिम षटकात टिच्चून मारा करीत भारताला विजय मिळवून देणारा हार्दिक पांड्या पुन्हा एकदा भारतीयांसाठी हीरो झाला आहे. काही महिन्यांपूर्वी ट्रोलर्सकडून खलनायक ठरविला गेलेला हार्दिक आता भारतीय विश्वविजयाचा नायक म्हणविला जातो आहे.
पण, असे असले तरी हार्दिकच्या वैयक्तिक आयुष्यातील वादळ थांबण्याचे नाव घेत नाही. हार्दिक आणि त्याची पत्नी ‘नताशा स्टॅनकोव्हिच’ यांच्यात आलबेल नसल्याचे बऱ्याच दिवसांपासून बोलले जात आहे. कदाचित त्यांचा काडीमोडदेखील होऊ शकतो, अशा बातम्याही पसरल्या होत्या. या गोष्टींना आता पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. कारण भारताच्या विश्वविजयानंतर खेळाडूंच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर सेलिब्रेशनच्या अनेक पोस्ट केल्या होत्या. पण, नताशाने मात्र अभिनंदनाची साधी एक पोस्टदेखील टाकलेली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा नेटकऱ्यांनी संशय व्यक्त करणे सुरू केले आहे.