हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

राष्ट्रीय मराठवाडा इतिहास परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. गोपाल बच्छीरे यांची बिनविरोध निवड

On: December 22, 2025 10:13 AM
Follow Us:
राष्ट्रीय मराठवाडा इतिहास परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्राचार्य डॉ. गोपाल बच्छीरे

लोणार | प्रतिनिधी – विनायक कुटे

राष्ट्रीय मराठवाडा इतिहास परिषद, डॉ. गोपाल बच्छीरे अध्यक्ष, इतिहास परिषद निवडणूक या विषयावर इतिहासप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे.
राष्ट्रीय मराठवाडा इतिहास परिषदेच्या 45 व्या दोन दिवशीय अधिवेशनात प्राचार्य डॉ. गोपाल बच्छीरे यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली.
ही निवड खुलताबाद येथील चिस्तीया महाविद्यालयात पार पडलेल्या अधिवेशनात झाली.राष्ट्रीय मराठवाडा इतिहास परिषदेच्या मागील कार्यकारिणीचा तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर या अधिवेशनात लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली.
या निवडणुकीत पूर्वी उपाध्यक्ष असलेले डॉ. गोपाल बच्छीरे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.सचिव पदासाठी झालेल्या निवडणुकीत डॉ. शरद गावंडेडॉ. संजय पाईकराव यांच्यात लढत झाली. यात डॉ. शरद गावंडे यांनी विजय मिळवला.
उपाध्यक्ष पदासाठी डॉ. सुभाष बेंजिरवारडॉ. गजानन पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली असून डॉ. गजानन पाटील हे निवडून आले.

या निवडणुकीत आठ जिल्हा प्रतिनिधी व दोन महिला प्रतिनिधींचीही निवड करण्यात आली.
निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. सोमनाथ रोडेश्री. एच. के. बागुल यांनी अत्यंत पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडली.

👉 विशेष जाहिरात | अधिक माहितीसाठी क्लिक करा

Advertisement

या प्रसंगी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. राजेश करपे,
डॉ. व्यंकटेश लांब, प्राचार्य गणी पटेल,
डॉ. ग. का. माने, डॉ. हरिभाऊ जमले,
डॉ. प्रभाकर मिरकड, डॉ. विजय पांडे,
माजी अध्यक्ष प्राचार्य नारायण सूर्यवंशी,
माजी सचिव डॉ. नितीन बावळे यांच्यासह अनेक इतिहास संशोधक व मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य डॉ. गोपाल बच्छीरे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत असून, इतिहास संशोधन क्षेत्रात ही निवड दिशादर्शक ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.


📢 वाचकांसाठी आवाहन

अशाच ताज्या, विश्वासार्ह आणि सखोल बातम्यांसाठी Kattanews.in ला  Follow करा आणि ही बातमी शेअर करा.


🔗 हे पण वाचा…

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

मेहकर न्यायालयातील बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

न्याय देणाऱ्यांच्या दारातच भ्रष्टाचार! मेहकर न्यायालयात खळबळ; वॉरंट थांबवण्यासाठी बेलिफ 10 हजारांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा लागू झाल्यानंतरची माहिती

राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; बळजबरीच्या धर्मांतरावर 7 वर्षांपर्यंत शिक्षा, जाणून घ्या काय आहेत नव्या तरतुदी

पाडळी शिंदे येथे करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून झालेल्या खूनप्रकरणानंतर घटनास्थळी जमलेले ग्रामस्थ

करंटने बकरी ठार झाल्याच्या वादातून ५५ वर्षीय व्यक्तीचा खून; अंढेरा पोलिसांनी अवघ्या दोन तासांत दोन आरोपींना केली अटक

मर्दडी देवी मंदिर चोरी प्रकरणात CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांचा तपास

देवीसमोर हात जोडले, नंतर त्याच गाभाऱ्यात चोरी केली! मर्दडीच्या जागृत देवस्थानातील धक्कादायक प्रकार CCTV मध्ये कैद

चौथा ग्रामपंचायतीने स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालयाला अभ्यासिकेसाठी सभागृह सुपूर्द

चौथा ग्रामपंचायतीचा विद्यार्थीहिताचा निर्णय; कार्यालयाचे सभागृह वाचनालयाला सुपूर्द, अभ्यासिकेची झाली सुरुवात

बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस पावसाचा इशारा

बुलढाण्यासह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट; पुढील पाच दिवस मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार पावसाचा इशारा

Leave a Comment