Dombivli Blast News| डोंबिवलीत भीषण स्फोट.८ ठार ६० जण जखमी.

Dombivli Blast News
Dombivli Blast News

 

 

Dombivli Blast News|डोंबिवली शहर गुरुवारी  दुपारी जबर स्फोटांच्या आवाजांनी यू हादरले. एमआयडीसीत रासायनिक न कारखान्यातील रिअॅक्टरचा स्फोट प होऊन झालेल्या दुर्घटनेत आठजण न, ठार, तर ६० जण जखमी झाले. या जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर न आहे. या दुर्घटनेमुळे २०१६ मध्ये याच या परिसरात प्रोबेस या कंपनीत न. झालेल्या भीषण स्फोटांच्या कटु आठवणी जागृत झाल्या.

 

येथील सोनारपाडा परिसरात एमआयडीसीमध्ये MIDC अंबर (अमूदान) केमिकल ही कंपनी आहे. छताच्या पत्र्यांना दिला जाणाऱ्या रंगाची निर्मिती होणाऱ्या या कारखान्यात रिअॅक्टरचा स्फोट झाल्यानंतर घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू झाले. रात्री उशिरापर्यंत आग विझविण्याचे काम सुरू होते.स्फोटात व आगीत मरण पावलेल्या आठजणांपैकी दोन महिलांची ओळख पटली आहे. रिद्धी खानविलकर (२५) आणि रोहिणी कदम (२०) अशी त्यांची नावे असून, त्या आजदेपाडा येथील रहिवासी आहेत.

 

अन्य दोन मृतदेहांपैकी एका मृतदेहाचा केवळ कंबरेच्या खालचा भाग हाती लागला आहे, तर दुसऱ्या मृतदेहाच्या डोक्याला जबर मार लागला असल्याने चेहरा ओळखता येण्याच्या पलीकडे आहे.

 

अनेक इमारतींना हादरे; काचा फुटल्या|Dombivli Blast News.

 

स्फोट एवढा शक्तिशाली होता की पाच किलोमीटरपर्यंत त्याचा आवाज ऐकू आला. तसेच स्फोटामुळे आसपासच्या आठ कारखान्यांना आगीच्या ज्वाळांनी लपेटले. परिसरातील निवासी इमारती, दुकाने, हॉटेल यांना भूकंप व्हावा तसे हादरे बसले. अनेक इमारतींच्या तर काचा फुटल्या.

स्फोटानंतर कारखान्याला आग लागून धुराचे प्रचंड लोट अवकाशात पसरले. स्फोटाने भयभीत झालेल्या महिला, मुलांनी वाट मिळेल तिथे सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. आगीचे लोळ, काळाकुट्ट धूर परिसरात पसरल्याने शहरभर भीती पसरली होती. एका मागोमाग एक तीन ते चार स्फोट झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.