धाड येथे विद्यार्थींना अरबी मदरसेत व शाळेत जाताना किचड व घाण तुडवत करावी लागते पायपीट.

Dhad news
Dhad news

 

 

सय्यद सलमान सय्यद नसीम, धाड  – (kattanews network)  : सर्वांगीण विकासाचे प्रवेशद्वार असलेले शिक्षण, हे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी अनेक संकटांचा (Student is in Difficulties) सामना करून जीवनाशी व डोळ्यासमोर असलेल्या परिस्थितीशी संघर्ष करत शिक्षण घेणाऱ्यांची ग्रामीण भागातील विद्यार्थी आजही कष्ट घेत आहे. चिखल तुडवीत विद्यार्थ्यांची शाळेला व अरबी मदरसे ला हजेरी लावत असल्याचा धाड वार्ड नंबर 5 नुर मस्जिद परिसर येथे दिसून येत आहेत.

 

 

धाड हे गाव बुलढाणा जिल्ह्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेला गाव(शहर )मानला जातो. धाड सारख्या मोठ्या शहरात गावातून शाळेत किंवा मदरसेत जाताना विध्यार्थीना इतका त्रास होतं कि जसं कोणी पादन रस्त्याने तर जात नाही ना? ग्रामपंचायत यांचा कडे कधी लक्ष देईल व गाव पुढारी काय झोपले आहेत का? असं प्रश्न विध्यार्थी व गावकऱ्यांना पडला आहे??

 

तसे पाहिले तर जे विध्यार्थी मदरसेत जात आहे त्यांचा कडे इस्लाम धर्मातील पाक ग्रन्थ (पुस्तक )हे असतात व रस्त्यावर जात असताना त्यांचे पाय फिसळतात किंवा मोटारसायकल ने त्यांच्या वर किचड उडतात . आता जर त्यांचे कपडे व बैग खराब झाल्यास ते मदरसेत जाऊ शकतात का???? तरी ग्रामपंचायत ला वार्ड नंबर 5 व सर्व गावाकऱ्यांनी मागणी केली आहे कि गावातील सर्व रस्ते ताबडतोब दुरुस्त करण्यात यावे .