
latest news : मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक सध्या कोणत्याही थराला जात आहेत. सध्या चॅलेंज घेतानाचे व्हिडीओ व्हायरल video viral होतात. मात्र असेच चॅलेंज घेत गरजेपक्षा अधिक खाल्ल्याने चीनमधील एका सोशल मीडियावर प्रसिद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे.
चीनमधील ‘पॅन जियाओटिंग’ २४ वर्षांची असूनही ती जेवणाशी संबंधित चॅलेंज स्वीकारायची. मात्र अशाच एका लाईव्ह सुरू असलेल्या चॅलेजदरम्यान १४ जुलै रोजी तिचा मृत्यू झाला आहे. जास्त खाल्ल्याने तिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. मुलीच्या आई-वडिलांनी तिला अधिक खाण्यास मनाई केली होती, असे असतानाही ती चॅलेंज स्वीकारत राहिली. ती एकाचवेळी १० किलोपेक्षा अधिक अन्न खात असे. मात्र हे अधिक खाणे तिच्या मृत्यूचे कारण ठरले आहे.