अनुदानावर मिळवा DAP डीएपी, युरीया खत.अर्ज केला नसेल तर लगेच अर्ज करा.

DAP scheme
DAP scheme

 

अनुदानावर मिळवा DAP डीएपी, युरीया खत.अर्ज केला नसेल तर लगेच अर्ज करा.अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीच्या हंगामात मदत व्हावी. यासाठी राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादकता वाढ व मूल्यसाखळी विकास योजनेंतर्गत युरिया व डीएपी  खतासाठी अनुदान दिले जात आहे. यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावे लागणार आहे.

 

नॅनो युरिया, डीएपी अनुदानावर मिळणार

 

सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू खरीप हंगामात नॅनो युरिया सोयाबीन, नॅनो डीएपी सोयाबीन, नॅनो युरिया कापूस, नॅनो डीएपी कापूस पिकांकरिता मिळणार आहे.नॅनो युरिया, डीएपी अनुदानावर मिळणार.

 

 अर्ज करण्याची शेवटची तारीख.

 

अनुदानावर युरिया, डीएपी प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत महाडीबीटीवर अर्ज करता येणार आहे. लाभार्थ्यांना ऑनलाइन केंद्रात जावे लागते. तेथे महाडीबीटीच्या वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करता येते.

 

 

कसा कराल ऑनलाइन अर्ज?

 

सदर निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाइन अर्जातून करण्यात येणार आहे.