
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! १०० टक्के अनुदानावर मिळणार फवारणी पंप बघा कसा करायचा ऑनलाईन अर्ज… २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंप’ या बाबीचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाइन अर्जातून ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर mahadbt portal १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप मिळणार असून, त्यासाठी ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे.
शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेंतर्गत २०२२-२३, २०२४- २०२५ या तीन वर्षांकरिता शेतकऱ्यांना अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर mahadbt portalऑनलाइन online पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. ऑनलाइन पद्धतीने महाडीबीटी पोर्टलवर MAHADBT Portal केलेल्या अर्जातून शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे. ही योजना शंभर टक्के अनुदानावर आहे. यामुळे अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
असा करावा अर्ज
mahadbt.maharashtra.gov.in या वेबसाइटचर लाभार्थी शेतकऱ्यांनी जावे. यूझर आयडी व पासवर्ड टाकणे, अर्ज करा, या बाबीवर क्लिक करावे. कृषी यांत्रिकीकरण बाबीवर क्लिक करावे, मुख्य घटक बाचीवर क्लिक करावे.
तपशील या बाबीवर क्लिक करून मनुष्य चलित औजारे घटक निवड, यंत्र, औजारे व उपकरणे, पीक संरक्षण औजारे, बैटरी ऑपरेटेड फवारणी पंप (कापूस किंवा सोयाबीन) बाब निवडून जतन, सेव्ह कराये अशी प्रक्रिया राबवून ऑनलाइन पद्धतीने आपला अर्ज शेतकऱ्यांना सादर करता येईल.
शेतकऱ्यांनी पोर्टलवर केलेल्या अर्जाची स्थितीही पडताळता येणार !
महाडीबीटीवर अर्ज सादर केल्यानंतर शासनाच्यावतीने दर हप्त्याला लॉटरी पद्धतीने अर्ज निवडले जातात यामध्ये तुमच्या अर्जाची निवड झाली तर,
तुम्हाला तुमच्या मोबाइलवर एक संदेश येईल त्यानुसार कागदपत्रे अपलोड करून द्या. तुम्हाला जर तुमच्या अर्जाची सद्यस्थिती बघायची असेल म्हणजेच अर्जाचे स्टेट्स बघायचे असेल तर ‘मी अर्ज केलेल्या बाबी या पर्यायावर क्लिक करा, छाननी अंतर्गत अर्ज या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अर्जाचे तपशील दिसेल.