crime news : किनवट kinvat ( जि. नांदेड ) शेतात आखाड्यावर झोपलेल्या माय-लेकावर अज्ञात चार जणांनी कुन्हाडी, दगडाने हल्ला केला. त्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर आई गंभीर जखमी झाली. ही घटना बोधडी bodhadi (बु) शिवारात १३ जुलैच्या रात्री दहाच्या सुमारास घडली. १४ जुलै रोजी सकाळी शेजारच्या शेतकऱ्यांनी बघितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. खून झालेल्या व्यक्तीचे नाव रामा माधव केंद्रे rama madhav kendre (वय ४०) असे आहे.
घटनास्थळी डीवायएसपी रामकृष्ण मळघणे, पोलिस निरीक्षक देविदास चोपडे हे सकाळीच दाखल झाले. महिना भरात बोधडी (बु) येथील खुनाची दुसरी घटना असल्याने एकच खळबळ उडाली. बोधडी येथील व मयत ‘रामा केंद्रे’ rama kendre ४०) व त्यांची आई गयाबाई (६५) हे दोघे बोधडीपासून २ किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे असलेल्या शेतात आखाडा करून राहात होते. १३ जुलैच्या रात्री ते दोघे झोपलेले असताना दहाच्या सुमारास अज्ञात चार व्यक्ती यांच्यात झटापटी झाल्या. पुढे नाल्यापर्यंत गेले. त्याठिकाणी रामा केंद्रे rama kendre याच्यावर कुन्हाडी, दगडाने हल्ल चढवला. त्यात रामा केंद्रे हे जागीच ठार झाले. त्याची आई गयाबाई यांच्य मानेला मार लागून त्यात त्या जखमी झाल्या. गयाबाईला उपचारासाठ आदिलाबाद येथे रेफर केले.