crime : चारित्र्याच्या संशयातून मित्रानेच ‘मैत्रिणीचा खून’ केल्याची घटना घडली. प्रियंका तायडे priyanka tayde (२६) असे महिलेचे नाव आहे. आरोपीला जळगावातून ताब्यात घेतले. खुनानंतर त्याने घराला कुलूप लावून जळगावला पलायन केले होते. ठाण्याच्या वागळे इस्टेट भागात राहणाऱ्या प्रियंका priyanka हिचा तिच्या पतीबरोबर काही दिवसांपूर्वी घटस्फोट झाला होता. तिचा जळगावातील मित्र तिच्या संपर्कात होता. ती अन्य कोणाशी तरी बोलते, याच कारणावरून त्यांच्यात वाद सुरू होते. याच वादातून त्याने ३ ते ७ जुलैदरम्यान तिच्या ठाण्यातील घरात शिरून तिच्या छातीवर आणि गळ्यावर चाकूचे वार करून पलायन केले.
चौकशीची मागणी
तिचा मृत्यू संशयास्पद वाटल्याने कुटुंबीयांनी याप्रकरणी मृत्यूच्या चौकशीची मागणी केली. तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात j.j hospital इन कॅमेरा करण्यात आले. मृत्यूचे कारण अनैसर्गिक असल्याचे निष्पन्न झाले. अनोळखी व्यक्तीने तिच्यावर चाकूने वार करून तिचा खून केल्याचा निर्वाळा शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाला. त्यानंतर आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला. सखोल तपासामध्ये तिच्याच ओळखीच्या पूर्वाश्रमीच्या मित्राचा या खुनामध्ये सहभाग असल्याची माहिती तांत्रिक विश्लेषणाद्वारे समोर आली.