
virat kohli : भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीची virat kohli सहमालकी असलेल्या वन८ कम्युन one 8 commune रेस्टॉरंटचे व्यवस्थापक आणि अन्य चार निर्धारित आस्थापनांवर कालावधीपेक्षा अधिक वेळ सुरू ठेवल्याप्रकरणी बंगळुरू पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.
‘
पोलिसांनी सांगितले की, ‘बंगळुरूमध्ये’ कित्येक रेस्टॉरंट व पब ठरवून दिलेल्या कालावधीनंतरही (रात्री १ वाजेनंतर) सुरू असल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानुसार ६ जुलै रोजी एक विशेष मोहीम राबवून अशा आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. ‘कब्बन पार्क’ येथील पोलिस ठाण्याचे एक उपनिरीक्षक रात्री गस्त घालत असताना १ वाजून २० मिनिटांनी वन८ कम्युन रेस्टॉरंटच्या ठिकाणी गेले, तेव्हा ते रेस्टॉरंट सुरू असल्याचे आढळून आले. रेस्टॉरंटविरोधात त्यामुळे पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे.