buldhana : दुचाकीवरून पडला म्हणून बहादराने चक्क.. आग लावून दुचकीलाच केले जाळून खाक.

 

 

 

buldhana : बुलढाणा रात्री रस्त्यावरून जात असताना पडल्याने रविवार २९ सप्टेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता आपली दुचाकी पेटून दिल्याची घटना बुलढाणा शहरात वृंदावन नगर vrundavan nagar येथे घडली. बुलढाणा buldhana शहरातील सुंदरखेड sundarkhed परिसरात राहणारे राजू भीमराव भगत हे काल रात्री आपली दुचाकी घेऊन घरी जात असतानाते गाडीवरून पडले, परंतू त्यांनी चक्क रविवार २९ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता आपली दुचाकीच जाळून टाकल्याचा प्रकार घडला आहे.

 

 

 

या घटनेनंतर त्या परिसरात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. बुलढाणा buldhana शहर पोलिस स्टेशनला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ते त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी दाखल होऊन ‘राजू भगत’ यास ताब्यात घेतले. बुलढाणा buldhana शहर पोलिस स्टेशनला घेऊन आल्यानंतर त्याची चौकशी केली, चौकशीमध्ये तो मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर बुलढाणा buldhana शहर पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. परंतु त्याने आपली गाडी का पेटवून दिली याबाबत माहिती मिळू शकली नाही. पोलिसांच्या चौकशी नंतरच याप्रकरणातील माहिती समोर येईल.