crime : पोटच्या मुलानेच आजारी वडिलांना जिवंत जाळले…

crime

crime : दारूचे व्यसन असलेल्या मुलाने आजारी वडिलांना घरातच जिवंतपणे जाळल्याची घटना बाळापूर balapur येथील लोटणापूर भागात १४ जुलै रोजी घडली. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी १७ जुलै रोजी खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. लोटणापूरमध्ये धनेगाव येथीलअजाबराव बापूसा इंगळे ajabrao bapusa ingale (५५) हे पत्नी व तीन मुलांसह मोलमजुरी करून भाड्याच्या खोलीत राहतात.

 

 

 

 

काही दिवसांपूर्वी अजाबराव यांना अर्धांगवायूचा झटका आला. त्यामुळे ते खटावर पडून होते दरम्यान 14 जुलै रोजी दुपारी २:३० वाजताच्या दरम्यान दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा ‘आकाश अजाबराव इंगळे’ akash ajabrao ingale (३०) हा घरात दारू पिऊन आला व त्याची आजारी वडिलांशी बोलचाल झाली. वाद वाढत गेला व रागाच्या भरात घरातील पेटलेल्या चुलीतील अग्नीने आजारी वडिलांच्या खाटेला खालून आग लावून तो घरातून निघून गेला. खाटेवरील कपड्यांमुळे आग भडकली. वृद्धाला अर्धांगवायूमुळे शरीराची हालचाल करता आली नाही.

 

 

 

या आगीत ते गंभीररित्या भाजल्या गेलेत. यावेळी मिळू शकली नाही. त्यांना उपचारार्थ अकोला akola येथील रुग्णालयात hosspital दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा तपास वर्ग होताच खुनाचा झाला उलगडा वृद्धाच्या मृत्यूनंतर अकोला • येथे कोतवाली पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली व तपास बाळापूर पोलिसांकडे वर्ग केला होता. घटनास्थळ पंचनामा व तिन्ही मुलांची कसून चौकशी केली. यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा आकाश याच्याविरुद्ध त्याचाच लहान भाऊ गौरव अजाबराव इंगळे gaurav ajabrao ingale (२४) याने फिर्याद दिली.याप्रकरणी पोलिसांनी आरोपी आकाश akash याला अटक केली असून, त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १०३ नुसार खुनाचा गुन्हा दाखल केला.