मुंबई | प्रतिनिधी |२५ फेब्रुवारी २०२६
मुंबईतील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या ग्रामपंचायत स्तरावरील संगणक परिचालकांच्या आंदोलनाला 24 फेब्रुवारी रोजी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले पाटील यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी संवाद साधला. त्यांच्या विविध प्रलंबित मागण्या समजून घेत सकारात्मक व सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
राज्यातील ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये कार्यरत हजारो संगणक परिचालक नागरिकांना शासकीय ऑनलाइन व ऑफलाइन सेवा पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. मात्र मानधन वाढ, सेवा सुरक्षा, कायमस्वरूपी कर्मचारी दर्जा यांसारख्या मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने त्यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.
या आंदोलनात राज्यभरातून तसेच बुलढाणा जिल्ह्यातील अनेक संगणक परिचालक सहभागी झाले असून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. आमदार महाले पाटील यांनी आंदोलनस्थळी उपस्थित राहून त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि न्याय्य मागण्या शासन स्तरावर मांडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.
शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन संगणक परिचालकांना न्याय देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. आंदोलनातील पदाधिकारी व संगणक परिचालकांनी त्यांचे आभार मानत आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधले.
📢 तुमच्या परिसरातील ताज्या बातम्यांसाठी
दररोज अपडेट राहण्यासाठी Kattanews.in ला भेट द्या आणि स्थानिक बातम्या सर्वप्रथम वाचा.
🔎 संबंधित बातम्या
- बेराळा फाटा ‘मृत्यूचा सापळा’? एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार, पत्नी गंभीर
- चिखला घटनेचा निषेध पेटला; आज चिखली बंद, बाजारपेठ पूर्ण ठप्प
- चिखली नगर परिषदेत विजयी महिला नगरसेविकांचा भव्य सत्कार; स्त्रीशक्तीच्या नेतृत्वाचा गौरव










