चिखली |प्रतिनिधी
दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी दारूबंदीचा कडक आदेश असताना चिखली पोलीस स्टेशन हद्दीत अवैध दारू व जुगाराविरोधात कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार डी.बी. पथकाने परिसरात सतत पेट्रोलिंग सुरू ठेवले होते.
याच दरम्यान गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहिती मिळाली की गौरक्षणवाडी परिसरात एक इसम अवैध देशी दारू विक्री करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने तातडीने सापळा रचत घटनास्थळी धडक दिली.
पोलिसांनी दोन पंचांसमक्ष छापा टाकून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याचे नाव रवि मधुकर नाटेकर (वय 38, रा. सिद्धार्थनगर, चिखली) असे असल्याचे समोर आले.
त्याच्याकडे असलेल्या दोन पिशव्यांची झडती घेतली असता सखू संत्रा कंपनीच्या 90 एमएलच्या 188 देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या. या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे 7,600 रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
सदर प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली पोलिसांनी अत्यंत वेगाने आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडली. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
👉 तुमच्या भागातील ताज्या बातम्यांसाठी Kattanews.in ला भेट द्या
📲 रोजच्या ब्रेकिंग न्यूज, स्थानिक अपडेट्स आणि व्हायरल बातम्यांसाठी आमच्या वेबसाईटला फॉलो करा.
Related News











