चिखली | (दि. २४ फेब्रुवारी २०२६)
चिखली-जालना मार्गावरील बेराळा फाट्यावर आज सकाळी घडलेल्या भीषण अपघातात एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी गंभीर जखमी झाल्या. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून हा मार्ग अपघातप्रवण असल्याची भीती नागरिकांत व्यक्त होत आहे.
अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. स्थानिकांनी हा फाटा अत्यंत धोकादायक बनत असल्याची चिंता व्यक्त केली आहे. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे येथे वाहतूक नियंत्रण, वेगमर्यादा अंमलबजावणी आणि चेतावणी फलक लावण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणी बसचालकाविरुद्ध चिखली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार भुषण गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत.
📌 संबंधित बातम्या
- चिखला घटनेचा निषेध पेटला; आज चिखली बंद, बाजारपेठ पूर्ण ठप्प
- चिखला काकड प्रकरण तापले : निरपराध ग्रामस्थांवरील गुन्हे मागे घ्या, दोषींवर कारवाई करा — वंजारी समाजाची एकमुखी मागणी
- वाहतूक नियमांचे पालन का महत्त्वाचे?
👉 तुमच्या परिसरातील बातमी आम्हाला पाठवा
स्थानिक घटना, समस्या किंवा बातम्या WhatsApp वर पाठवा. Kattanews तुमचा आवाज बनवेल.










