चिखली अर्बन को. आपॅरेटीव्ह बँक लि. चिखली शाखा खामगावने khamgaon कर्जदाराच्या पूनर्गठण ९ कोटी ५६ लाख कर्जासाठी खोट्या सह्या दस्तऐवजाचा उपयोग केला आणी जमानतदार असल्याचे भासवून फसवणूक केली. अशा तक्रारीवरुन खामगाव khamgaon शहर पोलिसांनी कर्जदार खाकरे दाम्पत्यांसह चौघांवर १० ऑगस्ट रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपींमध्ये खामगाव khamgaon शाखेचे तत्कालीन शाखाधिकारी वअध्यक्षांचाही समावेश आहे. याबाबत राजेश साहेबराव जाधव रा. सतिफैल खामगाव ह. मु. शेलूद ता. चिखली यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, खामगाव एमआयडीसीत माझे भगवती इंजिनिअरिंग वर्क्स नावाचे दुकान आहे व माझ्या दुकानाच्या जवळच अजय बाबुराव खाकरे व सौ. कल्पना अजय खाकरे रा. नांदुरा, ह. मु. बोबडे कॉलनी खामगाव यांची ‘अॅमीको अँग्रोटेक व शिवराज इंडस्ट्रीज’ या नावाने कंपनी आहे.
या दाम्पत्याने १८ डिसेंबर २०१९ रोजी चिखली chikhali अर्बन शाखा खामगाव येथून प्रथम १ कोटी ८५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्यावेळी मी व माझे सहकारी या दाम्पत्याला ओळखतो म्हणून ते आम्हाला बँकेत घेवून गेले होते. त्यावेळी बँकेचे अधिकारी कृष्णकुमार हरीनारायण पांडे यांनी तुम्ही कर्जदारांना ओळखता म्हणून फॉर्मवर सह्या करा. तुमचा या कर्जाशी काही संबंध नाही असे सांगितले आहे. त्यामुळे आम्ही फॉर्मवर सह्या केल्या होत्या.
परंतु हे कर्ज थकल्याने २९ सप्टेंबर २०२२ मध्ये चिखली अर्बनने कर्ज वसुलीसाठी प्रकरण सुरु केले व तशा नोटीससुध्दा मिळाल्या होत्या. यावेळी या कर्ज प्रकरणासाठी दाखल केलेल्या दस्तऐवजाची तपासणी केली असता त्यामध्ये माझ्या व इतर सहकाऱ्यांच्या कर्जाच्या पुनर्गठणासाठी बनावट सह्या केल्याचे दिसून आले. आणि आम्ही या कर्जास जामिनदार आहे असे दाखविण्यात आले व पुनर्गठण कर्ज मंजूर करुन घेतले.
या सर्व बनवाबनवीसाठी बँकेचे तत्कालीन शाखाधिकारी कृष्णकुमार पांडे, बँक अध्यक्ष सतीष गुप्त व संचालक मंडळ यांच्याशी संगणमत करुन जुन्या रक्कम पुनर्गठण कर्जात समाविष्ट करून तब्बल ९ कोटी ५६ लाख ८५ हजार कर्ज पुनर्गठणाच्या कागदपत्रांवर व मुल्यवान रोख्यांवर माझ्या खोट्या सह्या करुन दस्तऐवज तयार केले व मला जामिनदार दाखवून माझी संमती दर्शवून माझी व इतर जमानतदार यांची फसवणूक केल्याचे या तक्रारीत नमूद आहे. विशेष म्हणजे ज्यावेळी मी एका प्रकरणात न्यायालयीन कोठडीत बुलढाणा जेलमध्ये होतो. त्यावेळी हे सर्व करण्यात आल्याचेही तक्रारदार राजेश जाधव यांनी म्हटले आहे.
याप्रकरणी खामगाव khamgaon शहर पालिसांनी सौ. कल्पना अजय खाकरे, अजय बाबुराव खाकरे रा. बोबडे कॉलनी, कृष्णकुमार हरिनारायण पांडे रा. चिखली, सतिष गुप्त रा. चिखली यांच्याविरुध्द भारतीय न्याय संहिता कलम ४२०,४५१,४७१,४६७,४७४, ४६८, ३४ नुसार गुन्हा दाखल केला.याबाबत अधिक तपास खामगाव शहर पोलिस स्टेशनचे ठाणेदार नाचणकर करीत आहे.