chikhali : अज्ञात व्यक्तीने शेतातील सोयाबीन soybean सूडी पेटून दिल्याची घटना रविवार ६ ऑक्टोबरच्या रात्री घडली. त्यामुळे शेतकऱ्याच्या “हाता तोंडाशी आलेला घास” हिसकावला, लाखो रुपयांचे नुकसान झाले. चिखली chikhali तालुक्यात मात्र अंढेरा andhera पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या इसरुळ येथील पांडुरंग विश्वास भुतेकर pandurang vishwas bhutekar यांचे गावालगत शेत आहे. त्यांनी शेतातील सोयाबीनची सोंगणी करूण शेतात सुडी लावून ठेवली होती. आणि काही दिवसानंतर सदर सूडी मळणी यंत्राद्वारे काढूण घेणार होते. अज्ञात व्यक्तींनी रविवार ६ ऑक्टोबर रोजी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन सोयाबीन सुडी पेटविल्याचे दिसून आले.
घटनेची माहिती महसूल व पोलीस प्रशासनाला मिळताच लगेच त्यांनी घटनास्थळी धाव घेवून पंचासमक्ष पंचनामा केला. यावेळी ठाणेदार विकास पाटील vikas patil यांनी सर्वांनी आपल्या सोयाबिन ‘सुडीवर’ लक्ष ठेवावे, काही संशयित प्रकार दिसुन आल्यास तात्काळ बिट जमादार व ठाणेदार यांच्याशी संपर्क करावा. ज्या अनोळखी व्यक्तीने सुडी पेटवून नुकसान केले त्यांचा लवकरच तपास करून बेड्या ठोकल्या जातील असे पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले. मात्र शेतकऱ्याचे कधी न भरून निघणारे नुकसान झाले. त्यामुळे सदर शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळण्याची मागणी होत आहे.