हवामानबाजारभावशासन निर्णयनिवडणूकक्राईमनोकरीयोजनाफायनान्सलाइफस्टाइलगुंतवणूकऑटोएआयखेळआध्यात्मिकसिनेमा

[spt-posts-ticker]

चौथा ग्रामपंचायतीत स्वातंत्र्य दिन उत्साहात; वृक्षारोपणासह शहीद पंढरीनाथ नप्ते यांना अभिवादन

On: August 15, 2026 9:03 PM
Follow Us:
चौथा ग्रामपंचायतीत ८०वा स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

बुलडाणा : भागवत गायकवाड 

ग्रामपंचायत कार्यालय चौथा येथे ८०वा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. ग्रामपंचायत प्रशासक सौ. शारदा गजानन गायकवाड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी म. पू. मा. शाळा, चौथा येथील सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक, ग्रामस्थ तसेच ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वंदे मातरम् गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या औचित्याने यावेळी ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमस्थळी देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले.

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायतीच्या वतीने स्मशानभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत या उपक्रमात ग्रामस्थांनी सहभाग घेतला.

यावेळी शहीद पंढरीनाथ नप्ते यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. देशासाठी बलिदान देणाऱ्या शहीदांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

तसेच श्री. तेजराव एस. नप्ते यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ आणि कर्मचारी मंडळी उपस्थित होती.

स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमातून देशभक्ती, शहीदांच्या त्यागाचे स्मरण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

🇮🇳 KattaNews WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा
चौथा आणि परिसरातील ताज्या स्थानिक बातम्यांसाठी आमच्याशी जोडलेले रहा.
 
हे पण वाचा..
 
 
 
 

भागवत गायकवाड

भागवत गायकवाड हे KattaNews.in चे वार्ताहर असून बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्रातील गुन्हेगारी, स्थानिक घडामोडी, सरकारी योजना, शेती आणि जनहिताच्या विषयांवर अचूक, विश्वासार्ह व वस्तुनिष्ठ मराठी वृत्तांकन करतात.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

हे पण वाचा

बुलढाण्याचा बिहार वरून श्वेता महाले आणि संजय गायकवाड यांच्यात वाद

‘बुलढाण्याचा बिहार झाला’ म्हणत श्वेता महालेंचा हल्लाबोल; संजय गायकवाड म्हणाले, ‘त्यांच्या बुद्धीची…’

मालेगाव ते मेहकर महामार्गावरील खड्डेमय रस्ता

मालेगाव ते मेहकर महामार्गाचे दुपदरी सिमेंट कॉंक्रीटीकरण करा; माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांची गडकरींकडे मागणी

पत्रकारांवर आक्षेपार्ह टिप्पणीविरोधात देऊळगाव राजा येथे पत्रकारांची भूमिका

पत्रकारांवर आक्षेपार्ह टिप्पणी: उपोषणाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर वाद, पत्रकार संघ कायदेशीर मार्गाच्या तयारीत

बुलढाणा गोळीबार: विसर्जन मिरवणुकीत हवेत फायरिंगचा व्हायरल व्हिडिओ

बुलढाण्यात विसर्जन मिरवणुकीत रिव्हॉल्व्हर काढला अन् हवेत फायरिंगचा दावा; VIDEO व्हायरल, संजय गायकवाड म्हणाले…

साखरखेर्डा मटण मार्केट वाद सुरू असताना शाळेसमोर जमलेले नागरिक

साखरखेर्डा मटण मार्केट वाद: उर्दू शाळेसमोर दोन गटांत राडा, अखेर पोलिसांनी आखली ५० मीटरची मर्यादा

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी सिंदखेडराजा तहसीलसमोर नागपूर कराराची होळी करताना कार्यकर्ते

स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी सिंदखेडराजा तहसीलसमोर नागपूर कराराची होळी

Leave a comment