पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला सविस्तर वृत्त असे की मालवणमधील सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर राजकोट समुद्रकिनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना २६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास घडली. शिवरायांचा पुतळा कोसळल्याने या पुतळ्याच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावरून शिवप्रेमी संतप्त झाले आहेत.
माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी ४ डिसेंबर २०२३ रोजी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. शिवपुतळा परिसर सुशोभीकरणासाठी सुमारे ५ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी किशोल तावडे यांनी सांगितले की, मालवणच्या समुद्रकिनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी दुपारच्या सुमारास कोसळला आहे. जोरदार वाऱ्यामुळे हा पुतळा कोसळला. प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुतळा पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे.