बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
नुकतेच अवघ्या दोन महिन्यापूर्वी रुजु झालेल्या कुलदीप जंगम यांची उचल बांगडी झाल्यानंतर प्रभारी सीईओ म्हणून बी.एम.मोहन यांनी पदभार पदभार स्वीकारला होता. परंतु महाराष्ट्र राज्य सरकारने गुरुवार ला चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या यामध्ये शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक गुलाब खरात यांची बुलढाणा जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून बदली करण्यात आली आली आहे.