Buldhana : दिनांक 15 ऑक्टोंबर पर्यंत शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा द्या नाहीतर जलसमाधी घेणार श्री बालाजी सोसे यांचा निर्धार.

 

 

बालाजी सोसे/सिंदखेडराजा प्रतिनिधी 

 

बुलढाणा (buldhana) जिल्ह्यामध्ये 2023 अतिवृष्टीने ,26 नोव्हेंबर 2023 च्या गारपीटीमुळे खरीप आणि रब्बी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते यावेळी संपूर्ण राज्यांमधून नेते मंडळी शेतकऱ्याच्या बांधावर आले पण शेतकरी ढसाढसा रडत होता पण त्या शेतकऱ्याला न्याय मिळून दिला नाही नेत्यांनी अनेक शेतकरी पिक विम्यापासून वंचित राहीले होते पिक विमा तात्काळ मिळण्यासाठी जिल्हाभरातून शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय सिंदखेडराजा (sindkhedraja) ते उपविभागीय कार्यालय पर्यंत भव्य दंडवत मोर्चाचे आयोजनाचे आव्हान आज 10 ऑक्टोबर 2024 रोजी सर्व शेतकरी माय बापाला आव्हान केले होते.

 

 

आत्ता तरी स्वतःच्या हक्काच्या पिकविम्यासाठी एकत्र या जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षाचे नेते पदाधिकारी आपली स्वतःचे पद आणि आमदारकीचे उमेदवारी वाचवण्यात व्यस्त आहे .शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडून दिले असताना आपल्या बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी योद्धा कृती समिती बुलढाणा, जिल्हा बळीवंश लोक चळवळ, युवा संघर्ष समिती सिंदखेड राजा श्री बालाजी सोसे ,कैलास मेहेत्रे व गजानन जायभाये यांनी आव्हान केल्यानंतर आज पहिल्यांदाच शेतकरी रस्त्यावर दिसला कुठल्याही राजकीय नेत्याचा आधार नसताना सुद्धा त्या ठिकाणी हजारो शेतकऱ्याच्या उपस्थितीमध्ये भव्य दंडवत मोर्चा उपविभागीय कार्यालयावर धडक त्यावेळी पंचायत समिती सभागृह मध्ये एक अतिशय महत्त्वाची आढावा बैठक पार पडली.

 

 

 

त्या बैठकीमध्ये श्री बालाजी सोसे यांनी सांगितले की येणाऱ्या 15 ऑक्टोंबर पर्यंत जर शेतकऱ्याला पिक विम्या संदर्भात मागण्या पूर्ण न झाल्यास 16 ऑक्टोबरला बालाजी सोसे यांनी सिंदखेड राजा चांदनी तलावर जलसमाधीचा घेणार असल्याचा इशारा दिला पण कष्टकरी मायबापाच्या शेतकऱ्यांच्या पिक विम्यासाठी आता कोणीच बोलायला तयार नाही पिक विमा मिळून दिल्याचे श्रेय सर्वजण घेतात पण माझ्या अतिवृष्टी आणि गारपीट बाधित शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कोणी समोर येत नाही म्हणून दि 10 ऑक्टोबर 2024 ला गुरुवारी 2023 सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे (खरीपाचे) आणि 26नोव्हेंबर2023 गारपिटीमुळे (रब्बीचे) प्रचंड मोठे नुकसान झाली होते.

 

 

 

शेतकऱ्यासाठी बुलढाणा जिल्ह्याचे विद्यमान खासदार आणि बुलढाणा जिल्ह्यातील सर्वच आमदार साहेबांना बालाजी सोसे यांनी भर सभेमध्ये शेतकऱ्यासमोर हात जोडले आणि शेतकऱ्यांसाठी या सर्व मंडळीला समोर येऊन शेतकऱ्याला न्याय देण्यात यावा जर तुम्हाला आमच्या शेतकऱ्याच्या पीकम्याबद्दल बोलायचं नसेल तर आमच्या शेतकऱ्याच्या दारामध्ये तुम्ही मतदान माघायला यायचं नाही असे बालाजी सोसे यांनी ठणकावून सांगितले आणि येणाऱ्या 16 तारखेला जलसमाधी होणारच अन जलसमाधी घेणारच असं त्यांनी जाहीर केले आता या आंदोलनामध्ये प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे संपूर्ण बुलढाणा जिल्ह्याचे.