
buldhana : बुलढाणा शहरातील ऐतिहासीक शिवस्मारकासह २१ महापुरूषांच्या १६ स्मारकांचे लोकार्पण १९ सप्टेंबर २०२४ रोजी पार पडले. प्रारंभी सकाळी १२.३० वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे cm ekanath shinde यांचे बुलढाण्यात आगमन झाल्यानंतर कॉँग्रेस कमिटीचेजिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे, संजय राठोड आदी पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारे शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहिलेले निवेदन देण्यासाठी त्यांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केला.
मात्र, पोलिसांनी त्यांची अडवणक केली. जिल्हाध्यक्ष तथा माजी ‘आमदार राहुल बोंद्रे’ rahul bondre, संजय राठोड sanjay rathod आदी पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या मांडणारे शेतकऱ्यांच्या रक्ताने लिहिलेले निवेदन देण्यासाठी त्यांच्या ताफ्यात घुसण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्यांची अडवणक केली यावेळी कर्जमुक्ती मागत होतो. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आम्ही प्रशासनाला वेळ देखील मागितली होती. मात्र, आम्हाला वेळ देखील देण्यात आली नाही.
अशा हुकूमशाहीचा अंत जवळ आला असून मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या रक्ताची किंमत चुकवावी लागेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. यावेळी संजय राठोड, जयश्रीताई शेळळे, अनिकेत मापारी, समाधान सुपेकर, चित्रांगण खंडारे, सतिष मेहेंद्रे, गजानन मामलकर, नाजुकराव देशमुख, गणेशसिंह राजपूत, सुनिल सोनुने, रघुनाथ नरोटे, भगवान गायकवाड, विठ्ठल सोनुने, एकनाथ चव्हाण, प्रकाश देशमुख, गणेशराव पाटील, सोनु कुळे आदीसह यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते.
खोट्या भूलथापा देवून महिलांची गर्दी जमविण्याचा प्रयत्न : बोंद्रे
खोट्या भूलथापा देवून लाडकी बहिण योजनेच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला गर्दी जमविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. राहुल बोंद्रे यांनी केला. यासंदर्भात एक कॉल रेकार्डीग राहुल बोंद्रे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केली आहे. त्यात एक महिला मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला ज्या महिला येतील, त्यांना लाडकी बहिण योजनेचे १५०० रूपये ऐवजी २००० हजार रूपये मिळतील, अशा महिलांचे नावे लिहुल घेतल्याचे सांगत आहे. अशा प्रकारे खोट्या भूलथापा देवून महिलांची गर्दी जमविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप राहुल बोंद्रे यांनी यावेळी केला.