साखरखेर्डा/समाधान सरकटे
बुलढाणा जिल्ह्यातील पटवारी संघटनेत पुन्हा एकदा मोठा विक्रम नोंदवला गेला आहे. विदर्भ पटवारी संघाच्या बुलढाणा जिल्हा शाखेच्या निवडणुकीत विजेंद्र धोंडगे यांची सलग नवव्यांदा अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. ‘ट्रिपल हॅट्ट्रिक’ करत त्यांनी संघटनेतील आपला दबदबा कायम राखला आहे. तर शिवानंद वाकदकर यांनी सचिवपदी सलग तिसऱ्यांदा निवडून येत ‘हॅट्ट्रिक’ साधली आहे.
सभेच्या सुरुवातीला सचिव शिवानंद वाकदकर यांनी वर्षभराचा जमा-खर्च अहवाल सादर केला. त्याला सभागृहाने एकमताने मंजुरी दिली. त्यानंतर त्यांनी संघटनेच्या विविध कामांचा आढावा मांडत सदस्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
या आमसभेत तलाठ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. नायब तहसीलदार पदोन्नतीसाठी विभागीय परीक्षा, वेतनश्रेणी सुधारणा, ई-फेरफार आणि ई-पीक पाहणीतील अडचणी, तसेच शासनाच्या योजनांसाठी निधी यांसारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारमंथन करण्यात आले.
केंद्रीय सरचिटणीस संजय अनव्हाने यांनी संघटनेच्या बळकटीसाठी एकजूट आवश्यक असल्याचे सांगितले, तर केंद्रीय अध्यक्ष बाळकृष्ण गाढवे यांनी संघटनेच्या धोरणात्मक प्रयत्नांची माहिती दिली.
अध्यक्षीय भाषणात विजेंद्र धोंडगे यांनी गेल्या वर्षातील कामगिरीचा आढावा घेत पुढील काळातही संघटनेच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
नवीन कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्षपदी राहुल चौधरी, सहसचिवपदी प्रभाकर गवळी आणि कोषाध्यक्षपदी संजय डुकरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या सर्व निवडींमुळे जिल्ह्यात संघटनेत उत्साहाचे वातावरण आहे.
👉 Related News
- मंत्री बावनकुळेंचा तडकाफडकी निर्णय! चिखली प्रांत अधिकारी सक्तीच्या रजेवर, बुलढाण्यात खळबळ – नेमकं काय घडलं?
- रिल्सच्या नादात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! बसच्या धडकेत दीड वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
- Viral Video: ST बसमध्ये महिला कंडक्टरचा संताप, ‘तू कोण कलेक्टर आहे का?’ म्हणत प्रवाशांशी वाद
📢 तुमचं मत काय?
पटवारी संघातील या विक्रमाबद्दल तुमचं मत आम्हाला नक्की कळवा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी Kattanews.in ला नियमित भेट द्या.
👉 WhatsApp वर अपडेट मिळवण्यासाठी आत्ताच जॉइन करा:
Click Here










