buldhana : जिल्ह्याला ऐतिहासिक आणि पर्यटनाचा ‘वारसा’ लाभलेला आहे. या भौगोलिकस्थळांचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून बुलढाणा येथे विमानतळाची निर्मिती करावी. अशी आग्रही मागणी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव prataprav jadhav यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांच्याकडे केली आहे. पंतप्रधान मोदी pm modi यांच्या नेतृत्वात नवभारत निर्मितीचे कार्य सध्या सुरू आहे आज भारत हा जगाची तिसरी अर्थशक्ती म्हणून उदयास येत आहे देशांतर्गत रस्ते रेल्वे आणि हवाई वाहतुक या तिन्ही दळणवळणाच्या साधनांचा उपयोग नागरिकांना करता यावा या दृष्टिकोनातून देशपातळीवर काम सुरू आहे.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघात जागतिक कीर्तीचे खाऱ्या पाण्याचे लोणार सरोवर lonar lake आहे राष्ट्रमाता जिजाऊ यांची जन्मभूमी बुलढाणा जिल्ह्यात आहे शिवाय संत गजानन महाराज यांचं समाधीस्थळ असून आनंद सागर हे पर्यटक क्षेत्र आहे या धार्मिक अध्यात्मिक आणि पर्यटनस्थळाला भेटी देण्यासाठी देश विदेश आणि राज्यातील पर्यटक या ठिकाणाला भेटी देत असतात देश विदेशातील पर्यटकांच्यासाठी विमान सेवा ही जवळपास १२५ किलोमीटर दूर आहे त्या ठिकाणी पोचण्यासाठी किमान चार तास लागतात पर्यटकांच्या आणि बुलढाणा जिल्ह्याच्या विकासासाठी नवीन विमानतळाची आवश्यकता आहे नवीन विमानतळाची निर्मिती बुलढाणा येथे करण्यात यावी अशी आग्रही मागणी केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री किंजरापु राम मोहन नायडू यांची प्रत्यक्ष भेट घेऊन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली आहे.