बुलढाणा/प्रतिनिधी
buldhana : नऊवर्षीय चिमुकलीचा विनयभंग करणाऱ्या ८१ वर्षीय म्हाताऱ्यास येथील विशेष न्यायालयाचे न्यायाधीश आर. पन. बेहरे यांनी पाच कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ९ ऑक्टोबरला या खटल्याचा निकाल लागला. तालुक्यातील एका गावातील नऊवर्षीय मुलगी ३१ मार्च २०१९ रोजी दुपारी एक वाजता भागाजी लक्ष्मण नरवाडे bhagaji lkshaman narwade (८१) याच्या शेतात बकऱ्या चारण्याकरिता गेली होती. चिंचा देण्याचे आमिष दाखवून नरवाडे याने मुलीस गोठ्यात बोलाविले. त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. दरम्यान, ही बाब मुलीने आपल्या आई, वडिलांना सांगितली. मुलीच्या वडिलांनी धाड पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसंनी आरोपीविरुद्ध विनयभंगासह ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले. ठाणेदार प्रदीप ठाकूर यांनी तपास करून विशेष न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल् केले. हा खटला चालविण्यासाठी सरकारी विशेष सरकारी वकील अॅड. संतोष खत्री यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली. खत्री यांनी सात साक्षीदार तपासले. आरोपीला कठोर शिक्षा करावी, असा युक्तीवाद अॅड. खत्री यांनी केला. विशेष न्यायाधीश आर- एन. मेहरे यांनी दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून आरोपी भागाजी नरवाडे याला पाच वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. तसेच पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आरोपीस चार महिने साधा कारावास भोगावा लागेल, असा निर्णय दिला. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस उपनिरीक्षक रमेश चव्हाण यांनी सहकार्य केले.